Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोल्हापूरच्या परवान्यावरच संगमनेरात सोशल क्लबची तयारी

कोल्हापूरच्या परवान्यावरच संगमनेरात सोशल क्लबची तयारी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

कोल्हापुरच्या जिल्हाधिकार्‍यांची परवानगी मिळालेल्या परवान्यावरच संगमनेरात सोशल क्लब सुरु होण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

सुरु होणार्‍या या सोशल क्लबमुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची चिन्हे असूनही याबाबीकडे मात्र शहर पोलिसांचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

शहरातील सोशल क्लबची चर्चा आता गल्लीबोळात सुरु झाली आहे. या सोशल क्लबला तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली का? सदर सोशल क्लबचालकाला कोणत्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी परवानगी दिली आहे. करोनाचा प्रादुर्भाव असतांनाही अशा जुगार धद्यांना परवानगी का दिली जाते. असे प्रश्न शहरातील नागरीक विचारताना दिसत आहे.

या सोशल क्लबच्या एका टेबलवर सहा व्यक्ती जुगार खेळू शकतात. मात्र या सहाजणांपैकी एकाला जरी करोनाची लागण झाली तरी करोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सोशल क्लबचा दोन वर्षापूर्वी परवाना काढून घेण्यात आला होता. त्यामुळे हा व्यवसाय बंद झाला होता. आता या सोशल क्लब चालू करण्यासाठी कोणी परवानगी दिली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. या सोशल क्लब चालकाने दर महिन्याला काही वरीष्ठ अधिकार्‍यांची रक्कम ठरवल्याचीही गावात चर्चा होतांना दिसत आहे.

मात्र नव्याने आलेल्या पोलीस निरीक्षकांनी कठोर भूमिका घेतलेली असतांना या सोशल क्लब चालकाची हिमंत तरी कशी होते. दोन-तीन दिवसांपासून या सोशल क्लबचे डागडुगी सुरु असल्याचे दिसत आहे. गेल्या दहा दिवसापासून या सोशल क्लबची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाली.

करोना रुग्णांची संख्या वाढत असतांना अशा अवैध व्यवसायांना पाठबळ देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई होतांना दिसत नाही. नगरच्या जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नसतांना कोल्हापुरचे लायसन्स संगमनेरात चालते तरी कसे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या