Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म

४६ व्या वर्षी प्रीति झिंटाने दिला जुळ्यांना जन्म

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta) आणि तिचा पती जीन गुडइनफ (Gene Goodenough) यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक गोड बातमी दिली. त्यांच्या या बातमीने प्रितीचे चाहते प्रचंड आनंदीत झाले आहेत.

प्रीति झिंटा आणि पती जीन गुडइनफ यांंनी सरोगेसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. तिने स्वतः ट्वीटरवर ही गोड बातमी शेअर केली आहे. प्रितीने ही बातमी सोशल मीडियावर शेअर करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे.

- Advertisement -

प्रीतिने ट्वीटमध्ये आपल्या पती सोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. त्याखाली तिने लिहिले आहे की, ‘सगळ्यांना माझा नमस्कार, मी आज तुमच्या सर्वांसोबत एक मोठी बातमी शेअर करू इच्छित आहे. जीन आणि मी खूप खूश आहोत. आणि आमचे मन हे कृतज्ञता आणि प्रेमाने भरले आहे. आम्ही आमच्या परिवारात आमच्या जुळ्या जय जिंटा गुडइनफ आणि जिया जिंटा गुडएनफ या मुलांचे स्वागत करत आहोत.

प्रीति झिंटाने लिहिलेल्या पोस्ट वरून तिच्या मनातील आनंद आपल्या स्पष्ट दिसून येत आहे. तिने आपल्या मुलांचे नाव हे जय आणि जिया असे ठेवले आहेत. ज्यातून हे दिसून येते की, जय हा मुलगा आणि जिया ही मुलगी आहे. परंतु, प्रीतिने मुला-मुलींबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या