Monday, April 29, 2024
Homeजळगावपाण्याच्या शोधात गर्भवती हरीण अपघातात ठार

पाण्याच्या शोधात गर्भवती हरीण अपघातात ठार

फत्तेपूर ता.जामनेर । Fatehpur

येथून जवळच असलेल्या पिंपळगाव- चौखांबेला लागून वनविभाग व धरण असल्याने वन्यप्राणी या धरणावर पाणी पिणेसाठी येत असतात. या प्राण्यांना वनविभाग व धरणामध्ये असणारा राज्य मार्ग क्रं.-44 हा पार करावा लागतो. रविवारी सकाळी 9 वाजता धरणाहून दोन मादी हरीण व एक काळविट पाणी पिवून राज्य मार्ग क्रं.-44 रस्ता पार करीत असतांना याच वेळी फत्तेपूरहून- धामणगांव कडे भरधाव वेगाने जाणार्‍या आर्टिका कारने एका गर्भवती हरीणीस जोरदार धडक दिली. या अपघातात गर्भवती हरीणीला मार लागल्याने तिचा व तिच्या पोटातील पाडस ठार झाले.

- Advertisement -

घटनास्थळी जावून माहिती घेतली असता रविवारी सकाळी 9वाजता दोन मादी व एक काळवीट असा हरीण पिंपळगाव धरणाहून पाणी पिवून जंगलाच्या दिशेने जाण्यास निघाले. त्यावेळी ते राज्यमार्ग क्रं.-44 रस्ता पार करीत असतांना त्याच वेळी फत्तेपूरहून- बुलढाणाकडे जाणार्‍या भरधाव आर्टिका कारने यातील एका गर्भवती मादीला जोरदार धडक दिली. या अपघातात ती गर्भवती हरीण व तिच्या पोटातील एक पाडस जागेवर ठार झाले. त्यावेळेस मोटार सायकलने जाणार्‍या दोघांनी हा सर्व घटना क्रम पाहीला. त्यांनी अपघात करणार्‍या वाहनास पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन वेगाने पसार झाले.

घटनेची माहिती शेतकर्‍यांनी वन विभागाच्या कर्मचार्‍यांना दिली. वनरक्षक व्ही.ए. गायकवाड, पी.बी. काळे यांनी घटनास्थळी जावून वरीष्ठांना माहिती कळविली. वन कर्मचार्‍यानी पशुवैघकीय अधिकारी डॉ.राहूल ठाकूर, काकडे, तेजु कोळी यांना बोलावून पंचनामा केला. हरीण चार ते पाच वर्षाची असल्याचे समजले, तिची लांबी-135 से.मी . होती. तिच्या पोटात एका पाडसाचा गर्भ होता. त्यानंतर वन विभागात हरीणीचे शवविच्छेदन डॉ राहूल ठाकूर यांनी केले. तिच्या पोटात असणार्‍या पाडसास जोरदार धडक लागल्याने त्याचा व त्यानंतर हरीणीचा मृत्यू झाला, असे समजले. त्यानंतर वनविभागात एक गड्डा करून त्यामध्ये त्यांना पूरण्यात आले.

फत्तेपूर व गोद्री वन परिक्षेत्र अशा दोन बीट मध्ये वनक्षेत्र सर्वात मोठे आहे. या दोन बीटसाठी दोन वनपाल व वनरक्षक आहेत. मात्र बहुतेक वन कर्मचारी व दोन्ही वनपाल सोयीनुसार येणे-जाणे करतात. वरीष्ठांनी याबाबत योग्य ती चौकशी करून वन विभागातील वाढत्या चोरीचे प्रकार लक्षात घेता या ठिकाणी मुख्यालयी थांबणारे वनपाल व वनरक्षक यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या