Friday, April 26, 2024
Homeजळगावपूर्वप्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षण परवानगी

पूर्वप्राथमिक शाळांना ऑनलाइन शिक्षण परवानगी

जळगाव – प्रतिनिधी :

सद्य:स्थितीत कोरोना संकटामुळे प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रत्यक्ष सुरू करणे शक्य नाही.पर्यायाने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणासाठी गेल्या महिन्यातच राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली होती. कोरोना संकटामुळे प्रत्यक्षरित्या शाळा सुरू करण्यास अजून काही कालावधी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यानुसार शासनाने पूर्व प्राथमिक शाळांनीही ऑनलाइन शिक्षण देण्यास परवानगी दिली आहे. पर्यायाने विद्यार्थी शाळेत जाण्याऐवजी प्रत्यक्ष शाळाच घरी आल्यामुळे प्रत्यक्षरीत्या शाळा सुरू होण्याची अजून काही कालावधीची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र सध्या तरी जळगाव जिल्ह्यात दिसून येत आहे.

- Advertisement -

शाळा ऑनलाइनसाठी परवानगी

राज्याच्या सर्वच जिल्ह्यात विदर्भाचा काही जिल्ह्याचा अपवाद वगळता 15 जूनपासून शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे सुरू झाले. परंतु, नियमित रित्या शाळा प्रत्यक्षात सुरू झालेल्या नाहीत. जिल्ह्यात प्राथमिक तिसर्‍या इयत्तेपासूनच्या पुढील वर्गांसाठी ऑनलाइन शाळा भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येऊ नये, अशा सूचना शिक्षण विभागाकडून केल्या होत्या. आता ऑनलाइन वर्गांचे निश्चितीकडे लक्ष वेधले आहे.

स्क्रीन टाइम नियमावली जाहीर

केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाने पूर्व प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिकसाठी ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी व स्क्रीन टाइमविषयी नियमावली जाहीर केली. ऑनलाइन शालेय शिक्षण विभागाकडून पूर्वीच्या निर्णयात बदल करून पूर्वप्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या ऑनलाइन वर्गांना परवानगी दिली. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून यापूर्वी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या