Friday, April 26, 2024
Homeनगरप्रवरानगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी सहा ते सात बंगले फोडले

प्रवरानगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी सहा ते सात बंगले फोडले

राजुरी |वार्ताहर| Rajuri

प्रवरानगर येथे शनिवारी रात्री सहा ते सात बंगल्यांचे कडी कोयंडे तोडून घरातील कपाटाची उचकापाचक करून लाखो रुपयांचे दागिने व रोख रकमेसह एक लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली आहे.

- Advertisement -

प्रवरानगर येथील प्रवरा डावा कॅनॉलच्या कडेला असणार्‍या कारखाना परिसरातील ए टाईप व बी टाईप कॉलनी मधील सहा ते सात बंगल्यांची कडी व कोयंडे तोडून अज्ञात चोरट्यांनी शनिवारी रात्री घरातील कपाटाच्या उचकापाचक करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना घडली. चोरट्यांनी जे बंगले फोडले तेथे नेमके रात्रीच्या वेळी कोणीही घरात नव्हते. हे काम पाळत ठेवून झाले की काय, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.

चोरी झाल्याची माहिती मिळताच लोणी पोलीस या ठिकाणी दाखल होऊन संपूर्ण चोरी झालेल्या बंगल्यांची पाहणी केली. नगर येथून श्वानपथक फिंगर प्रिंट पथक बोलावण्यात आले होते. यामध्ये संतोष वाघमोडे, राजेंद्र विखे, संकेत कुकडे, जयसिंगराव तांबे, नितीनराव दळे यांचे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन हे बंगले फोडण्यात आले असल्याचे पुढे आले. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, उपनिरीक्षक योगेश शिंदे, एएसआय फटांगरे, पोलीस नाईक शिंदे, पोलीस नाईक सय्यद, कॉन्स्टेबल नरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या