Wednesday, April 24, 2024
Homeनगरप्रवरा कोविड सेंटरला प्रवरा बँक व ट्रक्स वाहतूक संस्थेकडून अडिच लाखांची मदत

प्रवरा कोविड सेंटरला प्रवरा बँक व ट्रक्स वाहतूक संस्थेकडून अडिच लाखांची मदत

लोणी |वार्ताहर| Loni

कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा प्रवरा परिवाराने नेहमीच जोपासली. सहकारी संस्थांनी पुढे येऊन दिलेले मदतीचे योगदान कोविड संकटाची लढाई जिंकण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल होत असलेल्या रुग्णांच्या मदतीकरिता प्रवरा सहकारी बँकेच्यावतीने 1 लाख आणि ट्रक वाहतूक सहकरी सोसायटीच्यावतीने 1 लाख 51 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

सामान्य माणसाला आज आरोग्य सुविधांची असलेली गरज लक्षात घेऊन आपण प्रवरा कोविड केअर सेंटर सुरू केले. दोनशेहून अधिक रुग्ण इथे उपचार घेत असून साठ रुग्ण यशस्वी उपचार घेऊन घरी गेले असल्याचे स्पष्ट करून आ. विखे पाटील म्हणाले की, कोविडच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवली जात असून नागरिकांनी जागरुक राहावे.

प्रवरा सहकारी बँकेचे चेअरमन बाळासाहेब भवर, व्हा चेअरमन अशोक आसावा, संचालक मारुती गोरे, प्रकाश शिरसाठ, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ बालोटे, दतात्रय उदावंत, ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकुमार राठी, संचालक साहेबराव दळे, संभाजीराव देवकर, पिरमहंमद पटेल, व्यवस्थापक जालिंदर खर्डे, प्रकाश तांबे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

कै. केदारनाथ बन्सीलाल राठी यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमिताने राठी परिवाराच्यावतीने 51 हजार रुपयांची रक्कम आ. विखे पाटील यांच्याकडे नंदू राठी, राजू राठी, मनोज राठी, गोपाल राठी, रुपेश राठी, रवी राठी, सुमित राठी यांनी सुपूर्त केली. बांधकाम व्यावसायिक शब्बीरभाई यांनीही 51 हजार रुपयांची मदत कोविड सेंटरला दिली.

संकटकाळी प्रवरा बँक नेहमी अग्रभागी : भवर

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी कोणत्याही संकट काळात पुढे येऊन समाजासाठी योगदान देण्याची शिकवण कार्यकर्त्यांना दिली. त्याचबरोबर प्रवरा बँकेने दुष्काळ, महापूर, भूकंप, करोना अशा संकट काळात नेहमीच पुढे येऊन मदत केली आहे. प्रवरा उद्योग समुहाचा बँक महत्त्वाचा घटक असून आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या महामारीच्या काळात सुरु केलेले प्रवरा कोविड सेंटर गरजुंना मोलाचा आधार ठरत असल्याने बँकेने पुढे येऊन या कामात हातभर लावल्याचे उद्गार बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर यांनी यावेळी काढले.

- Advertisment -

ताज्या बातम्या