Friday, April 26, 2024
Homeनगरप्रवरा व गोदावरी कालवा सल्लागार समितीची 21 व 22 डिसेंबरला बैठक

प्रवरा व गोदावरी कालवा सल्लागार समितीची 21 व 22 डिसेंबरला बैठक

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अहमदनगर पाटबंधारे विभागातील प्रवरा कालव्याची कालवा सल्लागार बैठक नागपूर येथे बुधवार दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता विधानभवनात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे.

- Advertisement -

या बैठकीस सर्व संबंधीत लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत. या बैठकीत 2022-23 मधील सिंचन व बिगरसिंचन आवर्तन कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे.

नाशिक पाटबंधारे विभागातील गोदावरी कालव्याची कालवा सल्लागार बैठक नागपुर येथे 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 4 वाजता विधान भवनात ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या बैठकीस सर्व संबधीत लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित राहाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या