Friday, April 26, 2024
Homeराजकीयप्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा ED कडून समन्स

प्रताप सरनाईक यांना तिसऱ्यांदा ED कडून समन्स

मुंबई | Mumbai

शिवसेना खासदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने २४ नोव्हेंबर रोजी धाड टाकली होती. त्यानंतर प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी बोलावले होते. मात्र सरनाईक यांनी उपस्थितीती लावली नाही. त्यानंतर आता पुन्हा तिसऱ्यांदा ईडीकडून प्रताप सरनाईक यांना समन्स धाडण्यात आले असून गुरुवारी उपस्थितीत राहण्याचे आदेश दिले आहेत.

- Advertisement -

ईडी चौकशी दरम्यान आपली बाजू भक्कम पणे मांडण्यासाठी आपल्याला चौदा दिवसांचा वेळ द्यावा, अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्या लीगल टीमकडून करण्यात आली होती. मात्र, यावर कुठलीही वेळ वाढवून देण्यास स्पष्टपणे नकार देत तिसऱ्यांदा प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. येत्या गुरुवारी प्रताप सरनाईक यांना ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर व्हावे लागणार आहे.

दरम्यान, टॉप्स सेक्युरिटी घोटाळ्या बाबत २४ नोव्हेंबर रोजी ईडीने धाडी टाकल्या होत्या. यापैकी तीन धाडी प्रताप सरनाईक यांच्याशी संबंधित होत्या. त्याचदिवशी प्रताप सरनाईक याना दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगतील होते. मात्र, आपण बाहेर गावाहून आलो आहोत. आपण क्वारंटाईन आहोत, असे सांगत सरनाईक यांनी चौकशी टाळली होती. क्वारंटाईनचा कालावधी संपल्यावर आपण चौकशीसाठी येऊ, असे सरनाईक यांनी म्हटले होते. मात्र, क्वारंटाईनचा कालवाधी उलटून गेल्यानंतरी ते ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले नाहीत.

आमदार प्रताप सरनाईक यांचा मित्र, भागीदार अमित चांदोले याला ईडीने अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला आणि प्रताप सरनाईक, विहंग सरनाईक यांची ईडीला समोरासमोर चौकशी करायची आहे. यासाठी ईडीला चांदोले याची ईडी कोडठी हवी आहे. या कोठडीसाठी ईडीने मुंबई हायकोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज दोन्ही बाजूने सुनावणी झाली. हायकोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. कोर्ट एक दोन दिवसात आपला निकाल देण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या