Sunday, May 5, 2024
Homeराजकीय‘ती’ भेट म्हणजे केवळ योगायोग ; कोणीही राजकीय अर्थ काढू नये

‘ती’ भेट म्हणजे केवळ योगायोग ; कोणीही राजकीय अर्थ काढू नये

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वांबोरी ग्रामपंचायतीच्या होत असलेल्या निवडणुकीसाठी

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना घेऊन एकसंघपणे महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविणार असून यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आदेश माजी खासदार ज्येष्ठनेते प्रसादराव तनपुरे यांनी कार्यकर्त्यांना भेटीप्रसंगी दिले.

दरम्यान, आपली व उदय पाटील यांची भेट ग्रामपंचायतीत भागीरथीबाई विद्यालयाच्या कामासाठी प्रशासकाच्या भेटीस गेलो असताना अचानक झाली असून यामध्ये कोणीही राजकीय अर्थ काढू नये, ही भेट म्हणजे फक्त योगायोगाने झालेली भेट असून याठिकाणी कोणतीही राजकीय व इतर चर्चा करण्याचा प्रश्नच येत नाही, असे माजी खा. तनपुरे यांनी स्पष्ट केले.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस कार्यकर्त्यांसह जनसेवा मंडळ व स्वर्गीय शिवाजीराजे गाडे यांचे शेतकरी मंडळाचे कार्यकर्ते यांनी एकदिलाने काम करून वांबोरी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आली पाहिजे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या सहकार्यातून वांबोरीच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होऊन ग्रामस्थांना सर्व सुविधा मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, ज्येष्ठ नेते सुरेश बाफना, बापूशेठ मुथा, किसनराव जवरे, एकनाथ ढवळे, अ‍ॅड. ऋषिकेश मोरे, उत्तम पठारे, भीमराज मांगुडे, सचिन पठारे, प्रशांत नवले, बंटी वेताळ, पोपट देवकर, आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या