Thursday, May 9, 2024
Homeनगरशिक्षकांचे फोटो वर्गात कशाला?

शिक्षकांचे फोटो वर्गात कशाला?

राहाता |वार्ताहर| Rahata

विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांची माहिती व्हावी यासाठी आपले गुरूजी या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो वर्गखोल्यांमध्ये दर्शनी भागात लावावेत, असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. परंतु आपले गुरूजी या उपक्रमामुळे आमचे अठरा वर्षांपासून विनावेतन काम करणार्‍या गुरुजींचे पोट भरणार का? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

श्री. शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, आमच्या विना वेतन काम करणार्‍या शिक्षकांचे प्रश्न सुटेल का? असा प्रश्न उपस्थित करत राज्यात शिक्षकांची अनेक प्रश्न प्रलंबित असताना असे उपक्रम राबवून शासन नेमकं काय साध्य करणार आहे, असा प्रश्न शिक्षकांना पडत आहे. शिक्षक दिनानिमित्त राज्यातील शिक्षकांना सन्मान म्हणून शासन कदाचित हा उपक्रम राबत आहे.

परंतु गेली 18 वर्षांपासून राज्यातील 63 हजार शिक्षक विनावेतन काम करीत आहे तर काही अगदी तुटपुंज्या वेतनावर काम करीत आहे. तेव्हा या शिक्षकांचा खरंच सन्मान राखला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राज्यातील शिक्षकांची होणारी हेळसांड थांबवा व 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व विना तथा अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना 100 टक्के वेतन देऊन शिक्षकांचा खरा सन्मान करा, असे श्री. शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या