Wednesday, April 24, 2024
Homeनगर1414 डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार

1414 डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांना लस देणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यात करोना लसीकरण मोहिमेसाठी आरोग्य विभागासह प्रशासन सज्ज झाले असून यासंदर्भात करोना लसीकरण कृतीदल स्थापन करण्यात आले आहे.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 1414 डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.

ही लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आले असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे समन्वयक असणार आहेत.तर तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, याशिवाय आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संघटना यांचा समावेश करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात तालुक्यातील आरोग्य विभागात काम करणार्‍या व खाजगी डॉक्टरांना लस देण्यात येणार आहे. तालुका आरोग्य विभागातील 14, बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील 150 व खाजगी 35 असे 185, पढेगाव आरोग्य केंद्रातील 131 व खाजगी 21 असे 152, टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 व खाजगी 21 असे 129, उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 118 व खाजगी 6 असे 124, निमगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 154 व खाजगी 22 असे 176, माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 121 व खाजगी 13 असे 134 श्रीरामपूर ग्रामीण 38 ग्रामीण आरोग्य रुग्णालय 45 व खाजगी 413 असे 458 तर करोना केअर केंद्रातील 4 अशा 1414 व्यक्तींना करोना लस देण्यात येणार आहे.

लस साठवण्यासाठीचेही नियोजन सुरू

लस आल्यानंतर ती एका विशिष्ट तापमानात ठेवावी लागणार आहे. त्याचेही नियोजन सुरू केले असून तालुक्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व इतर आवश्यक ठिकाणी लस साठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या