Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याOBC Leaders Meeting : "दिवाळीनंतर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी..."; सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंचा...

OBC Leaders Meeting : “दिवाळीनंतर ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी…”; सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा

मुंबई | Mumbai

मराठा समाजाला (Maratha Community) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याविरोधात मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी विरोध दर्शवला आहे. काल भुजबळ यांनी जालना आणि बीड येथे मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या मालमत्तांची भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याविरोधात आवाज उठवला होता. तसेच ओबीसी समाजाला आपले आरक्षण (Reservation) वाचवण्यासाठी जमेल त्या मार्गाने विरोध करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

भुजबळांच्या या वक्तव्यानंतर आज ओबीसी नेत्यांची (OBC leaders) त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी नेत्यांनी छगन भुजबळांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवित आता रस्त्यावरची आरपारची लढाई लढण्याचे संकेत दिले आहेत. तसेच भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा न देता सरकारमध्ये राहूनच लढा द्यावा, अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी माध्यमांना दिले.

OBC Leaders Meeting : छगन भुजबळांनी बोलावली सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक; काय निर्णय घेणार?

यावेळी बोलतांना शेंडगे म्हणाले की, “छगन भुजबळांच्या सोबत आम्ही आहोत. त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडायचे नाही. हक्काच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावरची लढाई सुरु करत आहोत. दिवाळी झाल्यानंतर रस्त्यावर उतरुन सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडणार असून राज्यभर आंदोलन उभे करणार आहोत. तसेच जो ओबीसी की बात करेगा वहीं देश पे राज करेगा.. देशभरातील ओबीसी नेत्यांना आम्ही आवाहन करुन लढा उभारण्यासाठी साद घालत आहोत, असे त्यांनी सांगितले.

तसेच पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने शब्द दिला होता की, ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही. मात्र, मराठा समाजाला कुणबी (Kunbi) दाखले देऊन आरक्षण हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुप्रीम कोर्टाने मराठ्यांना मागास नसल्याचे सिद्ध केले आहे. आज कुणबी दाखले देऊन मागास ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भुजबळ बोलले ते बरोबर आहे. न्यायमूर्तींनी अंतरवालीमध्ये जावून आरक्षण देण्याचे आश्वासन देणे चुकीचे आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरल्याशिवाय आता जमणार नाही. यापूर्वी आणि आता सरकारने ज्या समित्या नेमल्या त्यामध्ये सर्वच मराठा सदस्य होते. त्यामुळे मराठा समाज मागास नाही, हे सिद्ध झालेले आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal : “मराठा आरक्षणाला विरोध नाही पण…”; भुजबळांनी स्पष्ट केली भूमिका, जरांगेंवरही टीकास्त्र

ते पुढे म्हणाले की, आमची ६० टक्के लोकसंख्या (Population) आहे. सरकारला खाली खेचण्याची ताकद ओबीसींमध्ये असून रस्त्यावरच्या लढाईसोबत आम्ही न्यायालयीन लढाईदेखील लढणार आहोत, असेही ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते आमच्याविरोधात षडयंत्र रचत असून आम्ही षडयंत्रांना घाबरत नाही. जे काही चालले आहे विनाकारण चालले आहे. जर सरकार आणि सर्वपक्षीय नेत्यांनी हे थांबवले नाही तर आम्ही पुढे काय करायचे त्यासाठी समर्थ आहोत असे म्हणत निष्पाप आंदोलकांना अडकवण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे आणि सरकारला व सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Gram Panchayat Election Result : मोडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिल्पा आहेर; राष्ट्रवादीच्या गोरख बोडकेंनी सत्ता राखली

- Advertisment -

ताज्या बातम्या