Friday, April 26, 2024
Homeमनोरंजन'या' मराठी अभिनेत्रीने शेअर केले राज ठाकरेंच्या भाषणाचे व्हिडीओ

‘या’ मराठी अभिनेत्रीने शेअर केले राज ठाकरेंच्या भाषणाचे व्हिडीओ

मुंबई | Mumbai

गुडीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहुर्तावर काल शनिवार रोजी राज ठाकरे (Raj Thackeray) शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) कडाडले. त्यांच्या कालच्या भाषणाची महाराष्ट्रभरच नाही तर देशभर चर्चा आहे.

- Advertisement -

राज ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्यापासून ते मशिदींवरील भोंग्यापर्यंत आणि देशभरातील मतदारांनी राजकीय लोकांच्या भुमिकांकडे केलेल्या दुर्लक्षांपर्यंत मुद्दे उपस्थित करत जोरदार फटकेबाजी केली.

“जब भी जी चाहें नई दुनिया बसा लेते हैं लोग”; व्हिडीओ ट्विट करत जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरेंना डिवचलं

राज ठाकरे यांच्या भाषणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) राज ठाकरेंच्या भाषणाचे व्हिडिओ शेअर करत कौतुक केलं आहे. अभिनेत्री प्राजक्ता स्वतः या सभेला हजर होती.

प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांच्या सभेचे व्हिडीओ फेसबुकवर शेअर करताना लिहिलं, ‘नाही नाही… कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय… इतकाच हेतू. कलाकार नंतर, आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. (आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)’

शरद पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं; म्हणाले, “त्यांच्या तोंडाला कुणीही…”

- Advertisment -

ताज्या बातम्या