प्रयोगशील महिला शेतकरी भावना निकम यांचा गौरव

jalgaon-digital
4 Min Read

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Union Ministry of Agriculture and Farmers Welfare) प्रसिध्द केलेल्या देशभरातील प्रगतशील महिला शेतकरी (Progressive women farmers) व कृषि उद्योजकांच्या यशोगाथेत (Success stories of agri-entrepreneurs) दाभाडी (dabhadi) येथील

सरपंच व प्रयोगशील महिला शेतकरी भावना निळकंठ निकम (bhavna nilkanth nikam) यांनी 92 महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तालुक्यातील दाभाडीची सुन व लहान आघारची कन्या असलेल्या भावना निकम यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वथरातून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे (modern technology) शेतीत (Farming) विविध प्रयोग करीत असलेल्या महिलांच्या कार्याची ओळख देशभरात पोहचावी तसेच शेतीत महिलांचा सहभाग वाढविण्याबरोबर शेतीत कष्ट करणार्‍या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या (central governmnet) कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशभरात शेतीत विविध प्रयोग करीत असलेल्या महिलांच्या कार्याचे संकलन करण्यात आले होते.

देशभरातून निवडलेल्या 92 महिलांच्या यशोगाथेच्या निवडीची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) व कृषि मंत्रालयाचे सचिव संजय अग्रवाल (Secretary, Ministry of Agriculture, Sanjay Agarwal) यांनी नुकतीच करत या यशोगाथेचे प्रकाशन केले होते. या यशोगाथेत उत्तर महाराष्ट्रातून दाभाडीच्या प्रयोगशील शेतकरी भावना निकम यांच्या कामाची दखल घेण्यात आली आहे. यांत्रिक शेतीसाठी शेतात पदर खोचून उचलत असलेल्या कष्टामुळे भावना निकम यांनी तालुक्यात नावलौकिक मिळविला आहे.

शेतीची सर्व कामे करण्याबरोबर दुचाकी ते ट्रॅक्टरपर्यंत वाहन चालविणारी महिला तसेच फळबाग शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग राबविण्यात अग्रेसर असल्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढला आहे. या कामाची दखल थेट कृषिमंत्रालयातर्फे घेण्यात येवून प्रयोगशील महिलांच्या यशोगाथेत भावना निकम यांनी अव्वलस्थान पटकावल्याने त्यांनी दाभाडीचे नाव थेट राष्ट्रीय पातळीवर पोहचवले असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

राष्ट्रीय पातळीवर महिलांच्या यशोगाथेत स्थान पटकावल्याबद्दल कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी भावना निकम यांचे स्वागत केले आहे. या निवडीने दाभाडी व लहान आघार येथील ग्रामस्थांतर्फे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

शेतीला समर्पित झाल्याने यश

पारंपारिक पध्दतीने शेती करतांना खूप कष्ट सोसावे लागले. मातृत्वाच्या सुखापासून दोन वेळा वंचित देखील राहावे लागले. शरिराला विविध आजार जडले परंतू या सर्व संकटांना न डगमगता शेतीला मनापासून समर्पित होत आपण निस्वार्थ भावनेने काळ्या आईची सेवा केली. पारंपारिक पध्दतीवरून आधुनिक पध्दतीकडे वळत शेतीवर लक्ष केंद्रीत केले.

‘नाही’ हा शब्द माहित नाही. त्यामुळे शेतीशी संबंधित सर्व कामे मग ती नागरणी, वखरणी, पेरणीची असो की फवारणीची असो ती केली. ट्रॅक्टर चालविणे इतकेच काय वेळ आल्यावर कृषिपंपाची दुरूस्ती देखील केली. शेतात काय पेरायचे-लागवड करायची? व शेतमाल कसे विकायचे याचे निर्णय घेण्याचे अधिकार देखील पती निळकंठ निकम यांच्यासह परिवाराने आपणांस दिले आहे.

यामुळे समर्पित भावनेने कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण शेतात काम करीत गेलो. नवर्‍यासह कुटूंबाचे पाठबळ मिळत गेल्यानेच आपण या यशाच्या मानकरी होवू शकलो. कृषि विभाग तसेच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या सहकार्यामुळेच आधुनिक पध्दतीने शेती करण्यास मदत होवू शकली. लग्न झाल्यावर दहाव्याच दिवशी शेतावर जावून कष्टाची कामे करावी लागल्याने डोळ्यात अश्रू तरारळले होते.

मात्र वडिल शेतकरी मग नवरा कां नको या भावनेतून मी शेतीशी एकरूप झाले. समर्पित भावनेने केलेल्या निस्वार्थ कामाचे फळ देखील चांगले मिळते हेच या सन्मानाने दाखवून दिले असल्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी भावना निकम यांनी दै.‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *