Wednesday, April 24, 2024
Homeनगरदुचाकी, चारचाकीवांल्या 66 हजार कुटूंबांचे घरकुलांचे प्रस्ताव अपात्र

दुचाकी, चारचाकीवांल्या 66 हजार कुटूंबांचे घरकुलांचे प्रस्ताव अपात्र

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीसह, चारचाकी, घरात फ्रीज, टेलीफोन (लॅण्ड लाईन) यासह 13 अटीमध्ये बसणार्‍या 66 हजार कुटूंबांचा प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) पत्ता कट झाला आहे. या पैशावाल्या कुटूंबाचे प्रस्ताव हे ऑनलाईन (Online) पध्दतीने आधार लिंकमुळे (Link) फेटाळण्यात आलेले आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे (District Rural Development Systems) प्रधानमंत्री आवास योजनेतून ऑनलाईन (Online from Pradhan Mantri Awas Yojana)अर्ज येत असून येणार्‍या अर्जाची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून पडताळणी करण्यात येत आहे. यात बंगला (Bungalow) आणि दुचाकी (Two-wheeler), चार चाकीगाडी (Car), 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेचे किसान क्रेडीट कार्ड (Kisan Credit Card) असणारे, घरात फ्रीज (Refrigerate), टेलीफोन (लॅण्ड लाईन) (Telephone), कुटूंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत (Family member Government job) असल्यास, जमीन एनए असणारे (Land NA), कुटूंबातील व्यक्तीचे 10 हजार पेक्षा मासिक उत्पन्न असल्यास, अडीच एकर अथवा त्यापेक्षा अधिक बागायत जमीन असणारे, पाच एकर पेक्षा अधिक जिरायत जमीन असणारे, साडेसात एकर अथवा त्यापेक्षा अधिक जमीन एक मोटारीवर ओलीता खाली आणणारे कुटूंब यांची माहिती आधार लिंक असून या कुटूंबांनी प्रधानमंत्री आवास योजनेतून (Pradhan Mantri Awas Yojana) घरकुलासाठी ऑनलाईन अर्ज केेले होते. मात्र, आधारमुळे या कुटूंबाची आर्थिक परिस्थिती समोर आली असून प्राप्त 2 लाख 93 हजार 600 अर्ज पैकी 65 हजार 892 अर्ज अपात्र ठरले आहेत.

आर्थिक मागासवर्गीय नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana) सुरू करण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांत 2 लाख 93 हजार 600 जणांनीऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online registration) केले आहे. त्यातील 2 लाख 27 हजार 708 जणांचे अर्ज पात्र ठरले आहेत. यातील अनेक लाभार्थ्यांची कामेही पूर्ण झाली आहेत. तसेच घरकुल अनुदानाव्यतिरिक्त महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत (Mahatma Gandhi National Employment Guarantee Schemes) 90 ते 95 दिवसाच्या अकुशल मजुरीच्या स्वरूपात अर्थसाहाय्य दिले जाते.

लाभार्थींना घरकुल बांधकामासाठी (House Construction) 1 लाख 20 हजार रूपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. शिवाय 18 हजार मजुरीसाठी व 12 हजार शौचालयासाठी असे एकूण दीड लाख रूपये घरकुलासाठी मिळतात. ज्या अर्जदाराने जॉब कार्डवर रोजगार हमीवर आधी काम केले असेल अशा अर्जदारांचा प्राधान्याने विचार केला जातो.

जिल्ह्यात आलेले एकूण अर्ज – 2 लाख 93 हजार 600

गाडी, बंगलासह 13 अटीत बसणारे अपात्र लाभार्थी – 65 हजार 892

पात्र लाभार्थी – 2 लाख 27 हजार 708

- Advertisment -

ताज्या बातम्या