Pradeep Sharma : अँटिलिया स्फोटक प्रकरणी प्रदीप शर्मा यांना जामीन मंजूर

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांचे आणि व्यावसायिक मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा (Pradeep Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती एस बोप्पना यांच्या अध्यक्षतेखालील बँचने त्यांना हा जामीन मंजूर केला आहे…

Maharashtra Rain : राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय? वाचा सविस्तर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा यांना २०२१ मध्ये अटक (Arrested) करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरूंगात होते. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) त्यांचा जामीन नाकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

चांद्रयान-३ साठी आजचाच दिवस का निवडला? इस्रोच्या शास्रज्ञांनी सांगितले कारण

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयएने (NIA) सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करता याप्रकरणी शर्मा यांचा सहभाग असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले होते. त्यामुळे जामिनावर सुटका केल्यास ते साक्षीदारांवर दबाव टाकू शकतात किंवा अन्य पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात, असे न्यायालयाने शर्मा यांना यापूर्वी जामीन नाकारताना स्पष्ट केले होते.

Sinnar News : शाळकरी मुलीची त्रासाला कंटाळून आत्महत्या; संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा

यानंतर गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) त्यांच्या जामीन (Bail) अर्जावर सुनावणी घेतली होती. सुनावणीनंतर न्यायालयाने या संदर्भातला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर आज म्हणजेच मंगळवारी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे प्रदीप शर्मा हे लवकरच तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. प्रदीप शर्मा यांच्या वतीने मुकुल रोहोतगी (Mukul Rohotgi) यांनी बाजू मांडली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Nashik Accident News : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *