Friday, April 26, 2024
Homeधुळेमहापौरपदी प्रदीप कर्पेंना मिळाली पुन्हा संधी

महापौरपदी प्रदीप कर्पेंना मिळाली पुन्हा संधी

धुळे Dhule । प्रतिनिधी

ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्यावरून सात महिन्यातच महापौरपदाचा राजीनामा (Resignation of Mayor) द्यावा लागलेल्या प्रदीप कर्पेंना (Pradeep Karpe) भाजपाने पुन्हा एकादा संधी दिली आहे. आज कर्पेंनी महापौर पदासाठी आपला उमेदवारी अर्ज (Application for candidacy) दाखल केला. दुपारी दोन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यात कर्पे यांच्याशिवाय दुसरा कुणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे कर्पें यांची पुन्हा महापौर म्हणून निवड (Elected as Mayor) झाली आहे. याबाबत केवळ औपचारीक घोषणा आता बाकी राहिली आहे. कर्पे बिनविरोध महापौर झाल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवून तोंड गोड केले.

- Advertisement -

यावेळी खा.डॉ.सुभाष भामरे, माजी आ. राजवर्धन कदमबांडे, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, भाजपा नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाचा मुद्या थेट सर्वोच्च न्यायालयात गेला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे प्रदीप कर्पेंना अवघ्या सात महिन्यातच महापौर पदाचा राजीनामा द्यावा लागला. महापौर पदासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्याच्या सुचना केल्या गेल्या.

महापौर आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी जाहिर झाल्याने भाजपामध्ये अनेक इच्छुकांना आनंद झाला. पडद्याआडही खलबत्ते झाली. महापौर पद खुले झाल्याने प्रदीप कर्पेंसह हर्षकुमार रेलन, संजय जाधव, प्रतिभा चौधरी, वालीबेन मंडोरे यांची नावे पदासाठी चर्चेत होती. मात्र त्यात पुन्हा प्रदीप कर्पेंना संधी देण्यात आली.

ओबीसीच्या मुद्यावर त्यांना अल्प कालावधीत पद सोडावे लागल्यामुळे राज्यातील पक्षश्रेष्ठींनी या पदासाठी पुन्हा त्यांचा विचार करुन त्यांना ही संधी दिल्याचे खा.डॉ.भामरे, शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी सांगितले. 19 रोजी महापौर पदाच्या निवडीबाबतची अधिकृत घोषणा होईल. मात्र आज त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड निश्चित झाली आहे. त्यांना सुचक म्हणून देवेंद्र सोनार, राजेश पवार, भारती माळी यांच्या सह्या केल्यात. तर अनुमोदक म्हणून हर्षकुमार रेलन, किरण कुलेवार, सुनिल बैसाणे हे होते.

पक्षाच्या धोरणानुसारच कर्पेंना उमेदवारी मागच्या सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न व्यवस्थीत न हाताळल्याने प्रदीप कर्पेंना महापौरपदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. ज्या-ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवारांवर अशाप्रकारे अन्याय झाला असेल त्यांना पद सोडावे लागले असेल, अशांना पुन्हा संधी देण्याचे पक्षाचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरुनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आ.गिरीश महाजन, आ.जयकुमार रावल यांनी कर्पेंच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती खा.सुभाष भामरे यांनी दिली.

-खा.डॉ.सुभाष भामरे

जो चांगलं काम करतो त्यालाच संधी जो पक्षासाठी जिवाचे रान करतो, चांगले काम करतो, पक्ष त्यालाच संधी देतो, जो काम करत नाही, त्याला दुसर्‍या दिवशी घरी जावे लागते असे म्हणत अनुप अग्रवाल यांनी कर्पेंच्या उमेदवाराची समर्थन केले. ओबीसीच्या मुद्यामुळे कर्पेंचे पद गेले होते. मात्र पक्षाच्या धोरणानुसार त्यांना पुन्हा संधी दिली गेली. गेल्या अडिच वर्षात निधी मिळाला नाही आता सरकार आपलं असल्याने सहा महिन्यात विकासाचा अनुशेष भरुन काढू अशी ग्वाही अग्रवाल यांनी दिली. महापौर प्रदीप कर्पे बिनविरोध असल्याचे निश्चित झाल्यानंतर अनुप अग्रवाल म्हणाले की, आम्ही विकासकामात कोणताही भेदभाव केला नाही. सर्व नगरसेवकांना सारखाच निधी दिला. विकासकामांच्या धडाक्यामुळेच कर्पेंच्या विरोधात उमेदवार दिला गेला नसल्याचा दावा अग्रवाल यांनी केला.

-अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष

- Advertisment -

ताज्या बातम्या