Saturday, April 27, 2024
Homeनगरप्रभुपिंप्री येथे दरोडेखोरांचा धुमाकुळ

प्रभुपिंप्री येथे दरोडेखोरांचा धुमाकुळ

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील प्रभुपिंप्री येथील बोरुडे वस्तीवर दरोडेखोरांनी धुमाकुळ घातला. त्यांनी केलेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असून त्यांनी महिलांच्या अंगावरील दागिणे हिसकावून नेले. शेजारी राहणारे चौघेजण मदतीला धावले म्हणुन तिघांचे प्राण वाचले.अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. चोरट्यांच्या दोन मोटारसायकल घटनास्थळी सापडल्या आहेत.

- Advertisement -

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांची संख्या सहा ते आठ होती. प्रभुपिपंप्री येथील बोरुडे वस्तीवर आरोग्य विभागातील निवृत्त कर्मचारी संतराम बोरुडे यांना रात्री साडेअकरा वाजता कोणीतरी चौघेजण काठीने मारहाण करू लागले.ते धडपडुन उठले असता दरोडेखोरांनी दमदाटी करुन घर उघडायला सांगीतले व तुझ्याकडचे पैसे काढुन दे असे म्हणत एकाने बोरुडे यांचेवर चाकुने वार केला. त्यानंतर ते ओरडल्याने त्यांच्या पत्नीने घर उघडले व बाहेर आल्या. त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले.

मुलगा दत्ता बोरुडे यालाही चोरट्यांनी मारहाण केली. शेजारील विशाल बोरुडे, सिद्धार्थ बोरुडे, सुभाष बोरुडे व विवेक माळी हे चौघेजण संतराम बोरुडे यांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर मदतीला धावले. तेव्हा सिद्धार्थ बोरुडे याला चोरट्यांनी दगड मारल्याने ते जखमी झाले. मात्र चोरटे पळाले. शेजारी असलेल्या एकनाथ किर्तने यांच्या वस्तीवरही त्यांनी मारहाण करत महीलांच्या अंगावरील दागीने नेले आहेत.

जखमी संतराम बोरुडे,सुरेखा बोरुडे,दत्ता बोरुडे व सिद्धार्थ बोरुडे यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.संतराम व सुरेखा बोरुडे यांच्यावर शेवगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे करीत आहेत.चोरट्यांना तातडीने पकडावे अशी मागणी प्रभुपिंप्रीच्या ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या