Thursday, April 25, 2024
Homeनगरहेलिपॅड बनवण्यापेक्षा चालता येईल असे रस्ते बनवा- घोगरे

हेलिपॅड बनवण्यापेक्षा चालता येईल असे रस्ते बनवा- घोगरे

पिंपरी निर्मळ |वार्ताहर|Pimpari Nirmal

मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याची घोषणा केली आहे. त्यापेक्षा दळणवळणासाठी असलेले चालता येईल असे रस्ते करावेत, अशी मागणी लोणी खुर्दच्या कृषीभूषण प्रभाताई जनार्दन घोगरे केली आहे.

- Advertisement -

सौ. घोगरे म्हणाल्या, राहाता तालुक्यातील निम्यापेक्षा जास्त गावात आजही एसटी बस पोहचलेली नाही. अशीच अवस्था राज्याची आहे. सर्वसामान्य नागरिक खुप हालाखीत आपली उपजीविका करत आहेत. त्यांना दररोजच्या पोटाची खळगी भरण्याची गैरसोय असल्याने प्रवासासाठी चांगल्या व्यवस्थेची गरज आहे. तालुक्यासह ग्रामीण भागात चालता येईल असे रस्ते नाही, पिण्याचे पाणी नाही,लाईट नाही, चांगल्या आरोग्य सुविधा नाही. याकडे सरकारकडून दुर्लक्ष केले जाते. ही शोकांतीका आहे. मात्र हे सरकार सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी काम करण्यापेक्षा धनदांडग्यांसाठी कार्यरत आहे, असे आज दिसतेय.

मुख्यमंत्री आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीचे निर्देश देतायेत म्हणजेच हा कारभार पूर्णपणे हवेत चालला असून सर्वसामान्य नागरिकांशी या सरकारला कोणतेही देणेघेणे राहिलेले दिसत नाही. सरकारच्या प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणी करून याचा उपयोग सामान्य नागरिकांसाठी नक्कीच होईल का हा मोठा प्रश्न आहे. नागरिकांसाठी अद्याप एसटी पोहचली नसताना मुख्यमंत्र्यांचे हेलीपॅडचे आदेश हवेत आहेत, असे मत प्रभाताई घोगरे यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या