वीज चोरीप्रकरणी खंडाळा येथील महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महावितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांनी श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे णोन ठिकाणी छापा टाकून 83,360 रुपयांची वीज चोरी पकडली. याप्रकरणी एका महिलेसह दोन जणाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या घटनेत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे ममदापूर ग्रामीण कक्षचे कनिष्ठ अभियंता सचिन सीताराम बेंडकुळे यांनी खंडाळा येथील वैभव लक्ष्मण निकम याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. निकम याने महाराष्ट्र राज्य वीज कंपनीची 1,564 युनिट वीज रक्कम 24,860 रुपयाची चोरुन वापरल्याचे श्री. बेंडकुळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी निकम याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135, 138 प्रमाणे गुरनं. 12 दाखल केला आहे.

दुसर्‍या घटनेतही श्री. बेंडकुळे यानी खंडाळा येथील रोहिणी शाम खरात या महिलेविरुद्ध फिर्याद दिली असून खरात यांनी 3128 युनिट महावितरण वीज कंपनीची वीज रक्कम रु. 58,500 रुपयाची चोरुन वापरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन रोहिणी शाम खरात या महिलेविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135, 138 प्रमाणे गुरनं. 11 दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरिक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपासासाठी सदरचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.