Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईसह आसपासच्या शहरांतील वीज पुरवठा ठप्प

मुंबईसह आसपासच्या शहरांतील वीज पुरवठा ठप्प

मुंबई | Mumbai

मुंबईच्या अनेक विभागात आज सकाळी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

- Advertisement -

आज सकाळी अचानक वीज पुरवठा ठप्प झाला आहे. लोकल सेवाही ठप्प झाली आहे. मुंबईतील दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. घाटकोपर परिसरातही वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे.

तसेच पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेवरही ठप्प झाली आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून लोकल एकाच जागी थांबली आहे असून लोकलमध्ये प्रवासी अडकले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून पुन्हा लोकल सुरळीत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. सध्या हार्बर मार्गावरील काही लोकल पुन्हा सुरू झाल्याचं, समजतंय

कळवा ते पडघे या मार्गावरील विद्युत वाहिन्यांवर मल्टिपल ट्रीपिंग झाले असून टाटा पॉवर कडून येणाऱ्या वीज पुरवठ्यावर हे ट्रीपिंग आहे. त्यामुळे ३८० मेगावट वीज पुरवठ्याला फटका बसलाय. डहाणूकडून येणाऱ्या विद्युत वाहिन्यांना याचा फटका बसला आहे.

वीज गेल्यानं विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या आज परिक्षा आहेत. त्यामुळे वीज गेल्यानं पालक आणि विद्यार्थी चिंतेत आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परिक्षेचे पेपर सकळी 11 ते 12 या वेळेत आहेत. मुंबईत वीज नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना परिक्षा देणं शक्य होणार नाही, त्यांनी चिंता करू नये त्यांची परत परीक्षा घेतली जाईल, असं विद्यापीठाकडून संगण्यात आलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मोबाइलवर परीक्षा देता येत असेल त्यांनी पेपर द्यावा अन्यथा पेपर नंतर घेतला जाईल. त्याबाबत विद्यापीठ लवकरच माहिती देईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या