Friday, April 26, 2024
Homeजळगावचाळीसगाव येथे विजेचा लपंडाव

चाळीसगाव येथे विजेचा लपंडाव

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

तालुक्यातील गेल्या चार ते पाच दिवासांपासून थोड जरी वारा तरी देखील शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वारंवार वीज गुल होत आहे. यामुळे नागरिकांसह व्यापार्‍यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

गुरुवारी येथील बाजारपेठ परिसरात अचानक विद्युत प्रवाह वाढल्यामुळे साधारण वीस ते पंचवीस टीव्ही अनेक दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे व पंखे हे जळून गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्यामुळे व्यापार्‍यांचे मोठ्या प्रामाणात आर्थिक नूकसान झाले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन, भरपाईची मागणी व्यापार्‍यारी वर्गातून केली जात आहे.

चाळीसगाव परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून बत्तीगुल होण्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडत आहे. वार्‍यासह पावसामुळे वीज गेली ते एकवेळी ठिक आहे. परंतू पाऊस नसतानाही महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे अनेक भागात वारंवार वीज जात आहे. संद्या कोविडच्या काळात अनेक जण शासनाच्या नियमांचे पालन करत, बर्‍याच वेळा घरात थांबतात. परंतू विज नसल्यामुळे त्याना उकाडा सहन करावा लागतो. तर लहानमुळे, वृध्द व आजारी व्यक्तीना वीज नसल्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच व्यापारी संकुलांमध्ये देखील दिवसांतून अनेकदा वीज गुल होते, तर अनेकदा विद्युत दाब वाढल्युमळे, दुकानतील इलेक्ट्रीक साहित्या जळून खाक होत असल्यामुळे व्यापार्‍यांचे आर्थिक नूकसान होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता या गंभीर प्रकाराकडे लोकप्रतिनिधी व महावितरणाच्या वरिष्ठ आधिकार्‍यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या