Friday, April 26, 2024
Homeनगरभारनियमनाविरोधात संगमनेरात भाजपाचे आंदोलन

भारनियमनाविरोधात संगमनेरात भाजपाचे आंदोलन

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

महावितरणच्या भारनियमन विरोधात संगमनेर शहरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने संगमनेर बस स्थानकासमोर आघाडी सरकारच्या विरोधात कंदील (मेनबत्ती) आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

देशात मुबलक प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना आणि रेल्वे मंत्रालय आवश्यक तेवढ्या वॅगन उपलब्ध करून देत असताना राज्य सरकारच्या नियोजनाअभावी राज्यावर आज भारनियमनाचे संकट ओढावले आहे, लाईट बिलाची वसुली काटेकोरपणे सुरू असताना ग्राहकांकडून सिक्युरिटी डिपॉझीटच्या नावाखाली अतिरिक्त वसुली महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे, परंतु पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करण्यास महावितरण सक्षम नाही आहे.

2014 ते 2019 तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना राज्यात पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा करून भारनियमन मुक्त महाराष्ट्र केला असताना महाविकास आघाडी सरकारने आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना पुन्हा एकदा अंधारात लोटून भारनियमन चालू केले आहे, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही महाविकास आघाडी सरकारचा आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जाहीर निषेध करतो असे यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड. श्रीराम गणपुले म्हणाले.

यावेळी माजी शहराध्यक्ष सिताराम मोहरीकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, भाजपा ओबीसी मोर्चाचे उत्तर नगर जिल्हा उपाध्यक्ष दीपक भगत, भाजपा संगमनेर शहर सरचिटणीस भगवान गिते, किशोर गुप्ता, संगमनेर शहर भाजपाचे उपाध्यक्ष सुनील खरे, कैलास भरीतकर, युवा मोर्चाचे संगमनेर शहराध्यक्ष दिपेश ताटकर, भाजपचे संगमनेर शहर सचिव मनोज जुंदरे, अमित गुप्ता, कार्यालयीन प्रमुख संतोष पठाडे सर्व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या