Thursday, April 25, 2024
Homeनगरकुक्कुटपालन कंपनीला गंडा; आरोपींकडून 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कुक्कुटपालन कंपनीला गंडा; आरोपींकडून 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

अलिबाग (जि. रायगड) येथील कुक्कुटपालन कंपनीला (Poultry Company) 54 लाखांना गंडा (Fraud) घालणार्‍या आरोपींकडून ( Accused) नगर तालुका पोलिसांनी (Nagar Taluka Police) आतापर्यंत 18 लाख 96 हजार 320 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये आठ लाख 97 हजार 820 रूपये रोख रक्कमेचा समावेश आहे. याशिवाय पाच लाखांचा टेम्पो, चार लाख 68 हजार 500 रूपयांचे पक्षी व एक दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (API Rajendra Sanap) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण (PI Yuvraj Chavhan) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

- Advertisement -

या गुन्ह्यात आतापर्यंत महेश भोर, दीपक भोर व सुहास महांडुळे या तिघांना अटक (Arrested) करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत (Police Cell) आहेत. अलिबाग ( Alibag) येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनी (Premium Cheek Feeds Company) पोल्ट्री चालक शेतकर्‍यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची पिल्ले (Boiler Hens Chicks), खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात. शेतकर्‍यांनी दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकलेले असल्याचे प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे.

दरम्यान शेतकर्‍यांनी परस्पर पुणे (Pune) येथील एका कंपनीला पक्षी विक्री केेले होते. पोलिसांनी त्याला गुन्ह्यात साक्षीदार करून विक्री केलेल्या पक्षाचे आठ लाख 97 हजार 820 रूपयांची रक्कम त्याच्याकडून हस्तगत केली. याशिवाय आरोपींकडून एक टेम्पो, चार लाख 68 हजार 500 रूपयांचे पक्षी आणि गुन्ह्यातील एक दुचाकी हस्तगत केली आहे. या गुन्ह्यात आणखी सात आरोपी पसार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या