Thursday, April 25, 2024
Homeनाशिकनांदगावमधील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीला स्थगिती

नांदगावमधील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीला स्थगिती

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

जिल्ह्यातील चांदवड, निफाड आणि सिन्नर नंतर न्यायालयाने आता नांदगाव तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पद निवडणुकिला १६ फ्रेबुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. उर्वरित ९ तालुक्यांतील ३४२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १२ आणि १५ फेब्रुवारीलाच होणार आहेत.

- Advertisement -

नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायतींत सरपंच आरक्षणावरुन उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने येथील ५९ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडणुकीस स्थगिती दिली आहे.

सरपंच पदासाठी काढण्यात आलेल्या आरक्षणात पक्षपातीपणा केल्याच्या विरोधात सुनिता भगवान बनकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळेच स्थगित मिळाली. देवळा तालुक्यातील उमराणे आणि येवल्यातील कातरणी ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य निवडीत आर्थिक बोली लागल्याने निवडणूक आयोगाने दणका देत निवडणुकच रद्द केली.

राज्यभर हे प्रकरण जोरदार गाजले होते. आता अन्यायकारक पध्दतिने आरक्षण सोडतीच्या आरोपामुळे काहिजण न्यायालयात गेले आहेत.जात प्रवर्गनिहाय तसेच महिला आरक्षणाची काढण्यात आलेली सोडत वरवर नियमांचे पालन केल्याचे दाखवित त्यात पक्षपाती पणा झाल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी थेट उच्च न्यायालयातच याचिका दाखल केल्या आहेत.

आता नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायतींमध्ये दाखल झालेल्या याचिकेमुळे नांदगामधील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना स्थगिति देण्यात आली आहे. या अगोदर सिन्नरच्या १००, निफाडच्या ६५ आणि चांदवडमधील ५३ अशा तीन तालुक्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपद निवडणुकिला स्थगिती मिळाली आहे.

तालुकानिहाय ग्रामपंचायतींच्या निवडणुका

कळवण -२९, येवला -६८, इगतपुरी -०८, दिंडोरी -६०, त्र्यंबकेश्वर -०३, बागलाण -४०, देवळा -१०, मालेगाव -९९, नाशिक -२५

- Advertisment -

ताज्या बातम्या