Saturday, April 27, 2024
Homeनाशिकबिटको रुग्णालयात पोस्ट कोविड केअर सेंटर

बिटको रुग्णालयात पोस्ट कोविड केअर सेंटर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगरपालिका क्षेत्रात करोनाची दुसरी लाटेच्या शक्यतेनुसार देशात काही भागात करोना बाधीतांचा आकडा वाढत आहे. अशी स्थितीत करोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडुन बिटको रुग्णालयात पोस्ट कोविड केअर सुरू करण्यात येणार असुन याठिकाणी गंभीर कोविड रुग्णांची देखभाल केली जाणार त्यांना काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

- Advertisement -

नाशिक महापालिका क्षेत्रात आत्ता(दि.9)पर्यत 68 हजारावर कोविड रुग्ण आढळून आले असुन 922 बाधीतांचा मृत्यु झाला आहे. या एकुण रुग्णांतून 65 हजारावर रुग्ण बरे होऊ घरी पोहचले आहे. यात व्हेंटीलेटर व ऑक्सीजन वर असलेले गंभीर असे 2750 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहे.

यातील 1500 रुग्ण डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयातून बरे झाले आहे. अशाप्रकारे घरी गेलेल्या रुग्णांची फोनद्वारे बोलावून पुन्हा मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांच्यावर पाच सहा दिवस लक्ष ठेवून त्यांना पुढच्या काळात कोणती काळजी घ्यावयाची यासंदर्भातील मागदर्शन पोस्ट कोविड केअर सेंटर मध्ये डॉक्टरांकडुन केले जाणार आहे.

हा आजार फुफुसासंबंधीत असल्याने गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ऑक्सीजन देण्यात येतो. तेव्हा अशाप्रकारे स्थिती असल्यास गंभीर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी कोणती काळजी घ्यावयाची यासंदर्भात मार्गदर्श केले जाणार आहे.

यामुळे भविष्यात अशा रुग्णांना ऑक्सीजनची गरज कमी होईल आणि धोका देखील कमी होईल यादृष्टीने पोस्ट कोविड केअर सेंटर मध्ये काळजी घेतली जाणार आहे. यासंदर्भात मनपा प्रशासनाकडुन तयारी सुरु करण्यात आली असुन यातून भविष्यातील करोना प्रादुर्भाव कमी करतांनाच मृत्यु दर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या