Wednesday, April 24, 2024
Homeनगरसमुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी उद्या प्रवेश परीक्षा

समुदाय आरोग्य अधिकारी पदासाठी उद्या प्रवेश परीक्षा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यभरात रिक्त असलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी पदाच्या जागा भरण्यासाठी 16 ऑक्टोबरला प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली

- Advertisement -

असून नगरमध्ये भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल व रूपीबाई बोरा हायस्कूलमध्ये या परीक्षेचे केंद्र असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी हे पद असून याची राज्यभर शेकडो पदे रिक्त आहेत. त्यात नगर जिल्ह्यात 84 पदे रिक्त आहेत.

राज्याच्या आरोग्य विभागामार्फत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून नाशिक विभागात नाशिक, जळगाव आणि नगर जिल्ह्यात ही परीक्षा होत आहे. नगरच्या दोन्ही केंद्रांवर 514 उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरनाच्या पार्श्‍वभूमीवर परीक्षेची पूर्वतयारी करण्यात आली असून उमेदवारांना ई-मेलद्वारे प्रवेश पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली. ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागाची असली तरी जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या नियंत्रणात ही परीक्षा होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या