Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापोस्टाची आधार-मोबाईल जोडणी मोहीम ठरली वरदान

पोस्टाची आधार-मोबाईल जोडणी मोहीम ठरली वरदान

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नागरिकांना नवीन आधार कार्ड Aadhar Card काढणे किंवा आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे, Updation of Aadhar Card यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोस्ट खात्याने कार्यालय Post Office व पोस्टमनमार्फत आधारला मोबाइल क्रमांक संलग्न करण्याबाबतची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे. याचा फायदा आता खेड्यापाड्यातील लोकांना देखिल होत आहे. पोस्टमनमुळे ही सेवा अगदी घरपोच मिळत असल्याने ही मोहिम वरदान ठरत आहे. नाशिक शहरातील 26 पोस्ट कार्यालयातून आतापर्यंत 1700 नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.

- Advertisement -

या सेवेमुळे आता आधारकार्ड मोबाईलशी सलग्न करणे, पत्त्यात बदल करणे, नाव बदलणे, चुकीची दुरूस्ती करणे आदि कामे करण्यासाठी आता ई-सेवा केंद्र अथवा आधार केंद्रावर जाण्याची नागरिकांना गरज राहत नाही. त्याच बरोबर 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांचे नवीन आधार कार्ड म्हणजे बालआधार कार्ड देखिल काढून दिले जात आहे.त्यामुळे आता 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना नवीन आधार कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड केंद्र किंवा ई-सेवा केंद्र येथे जाण्याची आवश्यकता नसून त्यांचे आधार कार्ड आता पोस्टमनमार्फत मोफत काढून दिले जाणार आहे.

त्यासाठी पोस्टमन आपल्या मोबाईलमधून लहान मुलांचा फोटो घेऊन तो अपलोड करणार आहेत. त्यासाठी लहान मुलांच्या अंगठ्याचे ठसे किंवा डोळ्यांची स्कॅनिंग करण्याची आवश्यकता नाही. केवळ लहान मुलाचा फोटो, आई किंवा वडिलांचा आधार क्रमांक, तसेच बाळाचा जन्माचा दाखला यांच्या आधारे पोस्टमन त्यांच्या आधार कार्डची नोंदणी करून देतील. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे.

शहर व जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालय व पोस्टमनमार्फत ही सेवा सुरू केली असून सध्या अनेक नागरिकांच्या आधार कार्डशी मोबाईल क्रमांक संलग्न केलेला नाही किंवा काही नागरिकांचा पूर्वी संलग्न केलेला मोबाईल क्रमांक आता बदललेला आहे. आधार कार्डला मोबाईल नंबर संलग्न असणे आता फार गरजेचे आहे.

संलग्न केलेल्या मोबाईल क्रमांकावरच आधार ओटीपी येत असतो. आधार कार्डला मोबाईल क्रमांक सलग्न करण्याचे किंवा पूर्वी संलग्न केलेला क्रमांक बदलण्याचे कामदेखील पोस्टमनमार्फत केले जात आहे. या कामासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. त्यांनी आपल्या गावातील किंवा भागातील पोस्टमनशी संपर्क करून आपल्या आधार कार्डला मोबाईल संलग्न करता येईल. ही सुविधा पोस्टमन व सर्व पोस्ट कार्यालय येथे दिली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या