Thursday, April 25, 2024
Homeनगरकोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- आ. कानडे

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी प्रशासनाने सज्ज रहावे- आ. कानडे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेसाठी (Possible third wave of covid) उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय (Sub-District Rural Hospital), आरोग्य विभाग (Department of Health) तसेच प्रशासनाने सज्ज रहावे, असे आदेश आ. लहू कानडे (MLA Lahu Kanade) यांनी दिले.

- Advertisement -

येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात काल सोमवारी आ. कानडे (MLA Lahu Kanade) यांनी आढावा बैठक घेऊन सूचना दिल्या. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील (Tahsildar Prashant Patil), रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश बंड, मुख्याधिकारी गणेश शिंदे (CEO Ganesh Shinde), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे उपस्थित होते.

आ. कानडे (MLA Lahu Kande) म्हणाले की, जगभरातील अनेक देश कोविडच्या तिसर्‍या व चौथ्या लाटेचा सामना करत आहेत. भारतातही तज्ञांनी तिसर्‍या लाटेची (third wave of covid)शक्यता वर्तविली आहे. ती येऊ नये अशीच सर्वांची प्रार्थना आहे. मात्र तिसर्‍या लाटेचा सामना करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.

उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे येथे नवीन तंत्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा भरल्या जातील. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण स्वत: पाठपुरावा करणार आहोत. येथे उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड वॉर्डमध्ये दीडशे रुग्णांना भरती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना येथे वर्ग करून रुग्णालयात इतर आजाराच्या सेवा बहाल केल्या जाव्यात. कोविड वॉर्डमध्ये बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन यंत्रणेची चाचणी करून घेण्याचे आदेश आ. कानडे यांनी दिले.

कोविडच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान बालकांना संसर्ग होण्याची भीती तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यादृष्टीने शहरातील बालरोगतज्ञांची स्वतंत्र समिती गठीत करावी. त्यांच्या सूचनेवरून उपजिल्हा रुग्णालयामध्ये भौतिक सुविधा निर्माण करता येतील. त्याकरिता आर्थिक कोणतीही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. तिसर्‍या लाटेपूर्वी शहरातील खासगी कोविड सेंटर चालकांना ऑक्सिजन व औषधे यांचा स्वत: साठा उपलब्ध करण्याची सूचना द्यावी, असेही आ. कानडे यांनी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयाचे निर्जंतुकीकरण तसेच दिवसातून चार वेळा नियमित साफसफाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या