Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकरोनाच्या दुसर्‍या लाटेचा धसका

करोनाच्या दुसर्‍या लाटेचा धसका

मुंबई । प्रतिनिधी

राजधानी दिल्लीत करोना संसर्गाची दुसरी लाट धडकल्याने तेथील स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत चालली आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार सतर्क झाले असून दिल्लीशी तूर्त संपर्क तोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यान विमान सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

दिल्लीतील करोना रुग्णांची गेल्या काही दिवसात विक्रमी वाढ झाली असून तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. दिल्लीत अशी परिस्थिती असताना गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज होणार्‍या करोना पॉझिटिव्हच्या रुग्णांध्येही वाढ होऊ लागली आहे. यामुळे करोना संक्रमण मोडण्यासाठी कोणती खबरदारी घेता येईल याची चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरूवारी एक बैठक झाली. या बैठकीत मुंबई ते दिल्ली दरम्यानची विमान सेवा आणि रेल्वे सेवा बंद करण्याच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा झाली. या सेवेशी संबंधीत सर्व यंत्रणांशी एकमत करून मगच याबाबतचे आवश्यक ते आदेश काढण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

याबाबत राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असतान त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून दिल्ली-मुंबई विमानसेवा तसेच रेल्वेसेवा बंद ठेवता येईल का, याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. तसा प्रस्तावही असून तूर्त त्यावर केवळ चर्चा सुरू आहे. यात राज्य सरकारसोबतच रेल्वे, नागरी उड्डाण विभाग यांचीही परवानगी आवश्यक असल्याने संबंधितांशी चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे, असेही संजयकुमार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या