Wednesday, April 24, 2024
Homeजळगावआगामी काळात कापूस दरवाढीची शक्यता

आगामी काळात कापूस दरवाढीची शक्यता

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

जिल्ह्यात नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवडयात सीसीआय तर दि.28 नोव्हेेंबर रोजी कापूस पणन महासंघातर्फे कापसाची खरेदी सुरूवात करण्यात आली.

- Advertisement -

सद्यस्थितीत स्थानिक स्तरावर मार्केटमधे कापसाला बर्‍यापैकी तेजी असून आगामी काळात भाववाढ होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांच्या श्रमाला योग्य दाम मिळण्याची चिन्हे दिसून येत असून कापसाचे उत्पादन किरकोळ व्यापार्‍यांना देण्याची घाई करू नये असे बोलले जात आहे.

पांढर्‍या सोन्याचे उत्पादनात जिल्हा अग्रेसर असून जिल्हयातील व्यापार्‍यांंकडून मोठया प्रमाणावर शेतकर्‍यांकडील कापूस उत्पादनाची खरेदी केली जात आहे.

अनेक ठिकाणी कापसाची खरेदी करून मोठया वाहनांव्दारे परराज्यात प्रकियेसाठी रवाना केला जात आहे. जिल्हयात स्थानिक स्तरावर कापसाचे 5500 पासून ते सहा हजार रूपये क्विंटल दरम्यान दर आहेत.

तर अन्य परराज्यात कापसाला 6000 ते 6500 रूपये क्विंटल च्यावरच मागणी आहे. त्यामुळे आगामी काळात व्यापार्‍यांकडून खरेदी करण्यात येणार्‍या कापसाच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा कापसाची बोंडे उमलण्याच्या स्थितीत असतांनाच अति पावसामुळे काळी पडून उमलली नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हाती कवडीयुक्त कापसाचे उत्पादन आले आहे.

शासनाच्या कापूस खरेदी धोरणानुसार कापसामध्ये किमान 8 ते 12 टक्के आर्द्रतेच्या खाली असलेला कापसाची खरेदी करण्यात यावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या