Friday, April 26, 2024
Homeनाशिकशहीद श्रीकांत बोडके यांच्या कुटुंबियांना मंजूर क्षेत्राचा ताबा

शहीद श्रीकांत बोडके यांच्या कुटुंबियांना मंजूर क्षेत्राचा ताबा

सिन्नर । वार्ताहर Sinnar

मोह Moh- Sinnar येथील शहीद श्रीकांत बोडके Martyr Shrikant Bodke यांच्या कुटुंबियांना शासकीय कोट्यातून गावात पाच एकर क्षेत्र Five acres of land in the village from the government quota मंजूर झाले असून मंगळवारी (दि.26) तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते वीरमाता किसनाबाई बोडके Veermata Kisnabai Bodke यांच्याकडे या क्षेत्राचा ताबा देण्यात आला.

- Advertisement -

24 सप्टेंबर 2002 मध्ये जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात आपले कर्तव्य बजावत असताना श्रीकांत बोडके यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या आई किसनाबाई व वडील श्रीकृष्ण बोडके यांनी मोठ्या धीराने हा धक्का पचवला. त्यानंतर आपला धाकटा मुलगा किरण यालादेखील देशसेवा करण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केले. किरण हे सध्या मुंबई येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत राहून आपले कर्तव्य बजावत आहेत.

वीरमाता किसनाबाई यांना तेव्हापासून मानसिक धक्क्यांचा त्रास तर वीरपिता श्रीकृष्ण यांना अर्धबहिरेपण आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी शासकीय कोट्यातून शहिदांच्या कटुंबांना जमीन देण्यासाठी शासनाने आदेश काढल्यानंतर जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यातील शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबियांना जमीन प्रदान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली.

याच पार्श्वभूमीवर शहीद बोडके यांच्या कुटुंबाला गावातील गट क्र. 309/1 मधील मंजूर क्षेत्राचा ताबा देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्यानंतर मंगळवारी (दि.26) तहसीलदार कोताडे यांच्या उपस्थितीत या क्षेत्राचा ताबा शहीद बोडके यांच्या कुटुंबाकडे देण्यात आला. यावेळी त्रिदल वीरमाता संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रेखा खैरनार, नायब तहसीलदार सागर मुंदडा, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, भूमी अभिलेखचे पाटील, साळवे, गाढे, सुदाम बोडके, तलाठी खेडकर उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या