Sunday, April 28, 2024
Homeनाशिकएप्रिलमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८४ हजाराने अधिक

एप्रिलमध्ये कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ८४ हजाराने अधिक

नाशिक

गेली दिड महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या अखेरपासून पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढीला काहीसा ब्रेक लागला असून कोरोनावर मात करणाऱ्यांचा आकडा झपाट्याने वाढत चालल्याने नाशिककरांना दिलासा मिळात आहे. एप्रिल महिन्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरना मुक्त झालेल्यांची संख्या तब्बल ८४ हजार २९ आहे.

- Advertisement -

खरंच नाशिकला लॉकडाऊनचा फायदा झाला का? रुग्णसंख्येवर काय फरक पडला?

एप्रिल महिन्यात एकूण 1 लाख 26 हजार 441 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात डिसेंबर ते जानेवारी दरम्यान कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती. तर लॉकडाऊनही पुर्ण शिथिल झाल्याने जनजीवन पुर्ववत सुरू झाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्याच्या अखेर पासून नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढीस सुरूवात झाली.

कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने येऊन धडकली. यात रूग्ण पॉझिटिव्ह येण्याचा वेग हा दुपटीपेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट झाले. अशातच नागरिकांनी लग्नसराई तसेच सण- उत्सव यामध्ये कोरोना नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागला. मार्च तसेच एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत कारोना वाढीचा वेग मोठा असल्याचे तसेच मृत्युचे प्रमाणही वाढल्याचे चित्र होते. याचा मोठा फटका ग्रामीण भागात बसला. शहरांबरोबरच ग्रामीण भागातही आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र याच कालावधीत पाहावयास मिळाले.

एप्रिल महिन्यात मृत्युचे उच्चांक नोंदवले गेले. 21 एप्रिलला एकाच दिवसात 90 मृत्युची नोंद याच महिन्यात झाली. परंतु दुसरीकडे अखेरच्या आठवड्यात पॉझिटिव्ह तसेच मृत्युच्या आकड्यात मोठी घट झाल्याचेही सकारात्मक चित्र आहे.

एप्रिल महिन्यात 11 ते 13, 17 तसेच 26 ते 30 या कालावधीत प्रतिदिन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण मोठे आहे. 28 एप्रिलला पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रूग्णांचा आकडा 2 हजाराने अधिक होता.

नाशकात अनेक लसीकरण केंद्र बंद : लसी शिल्लक असलेल्या केंद्रांवर गर्दी

26 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत यात सातत्य असून एकंदर आता जिल्ह्यातून कोरोना कमी होत चालेल्याचे अशादायक चित्र पाहावयास मिळत आहे. हे प्रमाण 87 टक्के असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये घट होत असून जिल्ह्यात याच महिन्यात आतापर्यंतचे विक्रमी 90 मृत्यू नोंदवले होते. परंतु याच महिन्यात अखेरी हा आकडा 40 आला होता. सध्या त्यात घट होत असून २९ इताक खाली आला आहे.

एप्रिलमधील संख्या

* एकूण कोरोना बाधित : 1,42, 412

* कोरोनमुक्त : 2,26,441

* एकूण मृत्यू: 1,105

* रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ः 87 टक्के

- Advertisment -

ताज्या बातम्या