Tuesday, April 23, 2024
Homeमनोरंजनपूजा सावंत 'या' बॉलिवूड अभिनेत्यावर आहे फिदा

पूजा सावंत ‘या’ बॉलिवूड अभिनेत्यावर आहे फिदा

मुंबई | Mumbai

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर ‘बस बाई बस’ हा मराठी रिऍलिटी शो (Bus Bai Bus Marathi Reality Show) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये केवळ महिला सेलिब्रेटी सहभागी होत असतात. राजकारण ते मनोरंजनसृष्टी अशा प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान (Accomplished) महिला याठिकाणी पाहुण्या कलाकार म्हणून सहभागी होतात.

- Advertisement -

नुकताच या शोचा नवा प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये अभिनेत्री पूजा सावंत (Actress Pooja Sawant) दिसत आहे. यावेळी पूजाने आपले एक गुपित उघड केल्याने ती चांगलीच चर्चेत आली आहे.

पूजा सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram Account) ‘बस बाई बस’चा एक प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये पूजा सावंत सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सेटवरील इतर महिला कलाकरांसोबत धम्माल करताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये पूजा नेहमीसारखीच अतिशय सुंदर दिसत असून जांभळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. या प्रोमोमध्ये पूजा मनसोक्त गप्पा मारत आहे.

यावेळी पूजा सावंतने गुपित उघड केले असून बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रावर (Actor Siddharth Malhotra) आपला प्रचंड मोठा क्रश असल्याचे म्हटले आहे. तसेच त्याच्याशी लग्न झाले तर मला प्रचंड आवडेल असेही तिने सांगितले आहे. यानंतर सेटवर एकच कल्ला झालेला पाहायला मिळतो. पूजा सावंत मराठीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री असून तिचा एक खास चाहतावर्गही आहे. याशिवाय ती सतत सोशल मीडियावर (Social Media) आपल्या दैनंदिन अपडेट्स शेअर करत असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या