Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रचौकशी होईपर्यंत मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊ नये

चौकशी होईपर्यंत मंत्री राठोड यांचा राजीनामा घेऊ नये

वाशिम –

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने खळबळ

- Advertisement -

उडाली आहे. दरम्यान, जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत राठोड यांचा राजीनामा घेऊ नये असे निवेदन वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवीमध्ये आज बंजारा समाजाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

संजय राठोड यांनी कधी समोर यावं, याविषयीही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला बंजारा समाजातील धार्मिक नेते, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी संजय राठोड यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या