पूजा चव्हाण प्रकरण : भाजपच्या बापट यांचा तक्रार अर्ज दाखल

jalgaon-digital
2 Min Read

पुणे-

पुण्यातील तापलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी आज (गुरुवारी) वानवडी पोलिस ठाण्यात पहिला तक्रार अर्ज

दाखल झाल्याने आता या प्रकरणाला आणखी वळण लागण्याची शक्यता असून या प्रकरणाशी संबंधित वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी तिच्या घरच्यांनी किंवा इतरही कोणी तक्रार अर्ज न दिल्याने पोलिस तपास करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत असून पोलिस संजय राठोड यांच्या दावणीला बांधल्याचा आरोप भाजपच्या प्रादेशाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा आणि भाजपच्या पुणे शहर उपाध्यक्ष स्वरदा बापट यांनी आज वानवडी पोलिस ठाण्यात जावून या प्रकरणासंबंधी पहिला तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता असून संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. घटनेच्या कलम 306 व 107 प्रमाणे संजय राठोड यांच्यावर एफआयआर दाखल करावा असा अर्ज स्वरदा बापट यांनी केला आहे.

पूजा चव्हाण प्रकरणात ज्या 12 ऑडिओ क्लिप्स समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्या आहेत. त्यामध्ये पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर संबंधित पुरावे नष्ट करण्याचे आदेश अरुण राठोड या युवकाला दिले आहेत. या ऑडिओ क्लिपमधून पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे संबंध होते हे समजते. त्यातून सतत होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून किंवा प्रेमभंग किंवा राठोड यांच्याकडून होणाऱ्या होणाऱ्या दबावामुळे पूजा चव्हाण हिला आत्महत्या प्रेरित केल्याचे निष्पन्न होते आहे आणि सदरील पुरावे नष्ट करण्यास एका युवकला (अरुण राठोड)याला आदेश दिल्याचेही निष्पन्न होते आहे. त्यामुळे याप्रकरणी एफआयआर नोंद करून आणि पुढील कारवाईबाबत लवकरात लवकर आदेश काढावेत आणि आरोपीला अटक करावी अशी मागणी एक सुजाण नागरिक म्हणून करीत असल्याचे स्वरदा बापट यांनी त्यांच्या तक्रार अर्जात म्हटले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *