Friday, April 26, 2024
Homeनाशिकजोरदार पावसाने शेतीत तलाव

जोरदार पावसाने शेतीत तलाव

डुबेरे । वार्ताहर Sinnar / Dubere

सिन्नर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

- Advertisement -

त्यामुळे उभ्या पिकांमध्ये तलाव बनल्याचे चित्र ठिकठिकाणी बघायला मिळत असून कांदा पिकाच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

शनिवारी रात्री जोरदार पाऊस पडला. त्यामुळे परिसरात शेतांमध्ये दुसर्‍या दिवशीही प्रचंड पाणी दिसत होते. अनेक शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. अवाढव्य खर्च करुन केलेली कांद्याची लागवड पाण्याखाली गेल्याने शेतकरी हतबल झाले आहे.

चुनखडी शिवारात बाबुराव वारुंगसे यांच्या शेतातील कांद्याच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. त्यामुळे तेथील चित्र भाताची आवणी केल्यासारखे दिसत आहे. मोठा खर्च करुन कांदा पिक पाण्यात सडणार असल्याने वारुंगसे यांचे मोठे नुकसान होणार आहे.

उभ्या पिकात शिरलेले पाणी पाहून ते हतबल झाले आहे. तसेच कोथंबीर, मेथी आदी भाजीपाला पिकही या पावसाने झोडपले असल्याने त्या पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे दोन-अडीच तास झालेल्या पावसाने अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

कोरानाचे संकट घोंगावत असतांनाही अवाढव्य खर्च करुन घेतलेली पिके डोळ्यादेखत पाण्याखाली जात आहे. पावसाने झालेल्या नुकसानीचा शासनाने पंचनामा करुन नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी पंचायत समितीच्या माजी उपसभापती संगिता पावसे, नारायण वाजे, अंबादास वाजे, रामनाथ पावसे, सविता वारुंगसे, शरद माळी, अनिल वारुंगसे, मोहन माळी, गणेश वारुंगसे, रामहरी वारुंगसे यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या