Tuesday, April 23, 2024
Homeनाशिककिसान रेल्वेद्वारे डाळिंबाची वाहतूक

किसान रेल्वेद्वारे डाळिंबाची वाहतूक

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

किसान रेल्वे शेतकर्‍यांमध्ये लोकप्रिय होता आहे. ही गाडी आता पौष्टिक आणि प्रतिकारशक्ती वाढवणारी डाळिंब उत्तर भारतात वाहून नेत आहे.

- Advertisement -

एका महिन्यात 1100 पेक्षा जास्त टन डाळींब वाहतूक झाली आहे. नाशवंत वस्तूंची वेगवान वाहतूक, मालाच्या संख्येवर बंधन नाही, रस्त्यापेक्षा स्वस्त आणि टोलसह वाहतूक खर्चात बचत यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ होत असल्याने गाडीला प्रतिसाद वाढला आहे. त्यामुळे गाडी आठवड्यातून तीनदा सोडण्यात येत आहे.

डाळींब, शिमला मिरची, फुलकोबी, लिंबू, हिरव्या मिरची, आईस्ड-फिश, जिवंत वनस्पती, अंडी आणि इतर भाज्याची वाहतूक नाशिक, मनमाड, सांगोला, पंढरपूर, कोपरगाव, पुणे, दौंड या भागांतून केली जात आहे. किसान रेल्वेने आतापर्यंत वाहून नेलेल्या नाशवंत मालापैकी 1127.67 टन डाळींबचा समावेश आहे. एकूण मालाच्या हे प्रमाण 61 टक्के आहे.

किसान रेल्वे 7 ऑगस्टला देवळाली ते दानापूर दरम्यान सुरु झाली. ती मुजफ्फरपूर पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्यानंतर सांगोला/पुणे येथून मनमाड येथे लिंक रेल्वे जोडण्यात आली. डाळिंबामध्ये एक प्रभावी पोषक घटक आहेत ज्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट, पोटॅशियम इत्यादींचा समावेश आहे. नाशिक, पुणे आणि सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष उत्पादन होते. डाळिंबाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 62.91 टक्के आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या