Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरडाळिंबावर तेल्या रोग पडल्याने शेतकरी अडचणीत

डाळिंबावर तेल्या रोग पडल्याने शेतकरी अडचणीत

कोपरगाव|प्रतिनिधी|Kopargav

सततचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळ डाळींब उत्पादक शेतकरी हैराण झाले आहे. डाळींब फळावर तेल्या व टिपका रोगचा मोठा प्रादुर्भाव तालुक्यातील कोळपेवाडी, सुरेगाव, शहजापुर, कोळगाव थडी या गावांच्या परिसरात दिसून येत आहे. परिसरातील बागा या रोगामुळे नामशेष झाल्या आहेत. करोनाच्या संकटाबरोबर तेल्या रोगानेशेतकरी उध्वस्त झाले आहे.

- Advertisement -

तालुक्यात तेल्या रोगाने प्रचंड थैमान घातले आहे. काही शेतकर्‍यांनी तेल्याची फळे तोडून बाजारात विक्रीसाठी नेली असता 20 रू कॅरट प्रमाणे बाजारभाव मिळाले. काही शेतकर्‍यांनी रोजंदारीवर मजूर लाऊन फळे तोडून फेकून दिली आहे.

डाळींब पिकावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले आहे. त्यात कोरोना महामारीने मार्केट ही बरोबर चालत नाही. तेव्हा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. डाळींब शेतकरी मागील वर्षी सूरेगाव सजेतील विम्या पासून वंचित राहिले आहे. ही सजा व शेतकरी विमा न मिळाल्याने थकले आहेत.

या वर्षी तेल्यामुळे अडचणीत आला आहे. डाळींब शेतकरी सावरावे यासाठी सरकारने या शेतकर्‍याच्या बागेचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी कोळपेवाडी येथील डाळींब उत्पादक शेतकरी कचरू कोळपे यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या