Saturday, April 27, 2024
Homeनगरडाळिंबावरील तेल्या रोगावर वेळीच उपाययोजना करा

डाळिंबावरील तेल्या रोगावर वेळीच उपाययोजना करा

बाभळेश्वर |वार्ताहर| Bhabhaleshwar

राहाता (Rahata), श्रीरामपूर (Shrirampur), संगमनेर (Sangmner), कोपरगाव (Kopargav), राहुरी (Rahuri) तालुक्यातील डाळिंबावर तेलकट रोगाचा प्रादुर्भाव (Outbreaks of Oily Disease on Pomegranate) वाढलेला आहे. त्यादृष्टीने तेल्याग्रस्त डाळिंब बागामध्ये राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर (Babhaleshwar) येथील शास्त्रज्ञांनी पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) या गावात शिवार फेरीचे आयोजन केले होते. यामध्ये गावातील डाळिंब उत्पादक दादासाहेब बजरंग आहेर, डॉ. दिलीप निर्मळ, संदीप निर्मळ यांच्यासमवेत इतर डाळिंब्याच्या बागांची पाहणी करण्यात आली.

- Advertisement -

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र (National Pomegranate Research Center) सोलापूरच्या (Solapur) प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर उद्यान विद्या विभागाचे डॉ. पुरुषोत्त्म हेन्द्रे, पीक संरक्षण विभागाचे भरत दंवगे यांनी परिस्थितीचा आढावा घेत तातडीने करावयाच्या उपाययोजनेसंबंधी माहिती दिली.

डॉ. ज्योत्सना शर्मा म्हणाल्या की, बहुतांश बागांमध्ये पीक पोषणाचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने पीक संरक्षणाच्या उपाययोजना केल्यामुळे तेल्या आणि करपा रोगासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र शिफारशीप्रमाणे डाळिंबाचे पीक पोषण आणि जीवाणूनाशक औषधांच्या फवारण्या केल्यास तेल्या रोगावर यशस्वीरित्या नियंत्रण मिळविणे शक्य आहे.

तेलकट डाग रोगांसाठी आपत्कालीन फवारण्या (Emergency Sprays) करताना फळे लिंबाच्या किंवा पेरू आकाराची असताना तेलकट डागाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येताच 5 दिवसांच्या अंतराने 2 फवारण्या घ्याव्यात. फळबागेत (Orchard) असलेल्या बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावानुसार कॉपरजन्य बुरशीनाशकांमध्ये बदल करून फवारण्या कराव्यात.

शेतकर्‍यांनी आपले झाड निरोगी कसे ठेवता येईल यासाठी प्रयत्न करावेत, जमीन, झाडांचे पोषण, हवामानातील चढउतार, पडलेला पाऊस यावर आधारित उपाय करावे, असे सांगितले.

भरत दंवगे (Bharat Davange) यांनी सांगितले की, छाटणी केलेल्या डाळिंब बागेतील रोगट पाने, फुले, फळांचे अवशेष बागेतसाचू देऊ नयेत. ताबडतोब जाळून नायनाट करावा, छाटणीच्या कात्र्या 1 टका सोडीयम हायड्रोक्लोराईडच्या किंवा डेटॉलच्या द्रावणाने निर्जंतूक कराव्यात. छाटणी आणि स्वच्छतेनंतर जमिनीवर 4 टक्के कॉपर डस्टबी 8 किलो प्रति एकर धुराळणी करावी. छाटणीनंतर संपूर्ण बागेत 1 टक्का मोड़ों मिश्रणाची फवारणी करावी, बागेत प्रत्येक झाडास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे.

अन्नद्रव्ये व्यवस्थापनामध्ये (Nutrient Management) सेंद्रिय घटकांचा जादा वापर करावा. त्यासोबत सुडोमोनास फ्ल्युरोसंटस आणि बॅसीलस सबटीलीस या जिवाणूंचा 2 लीटर प्रति एकर या प्रमाणात वापर करावा. ज्या बागेमध्ये मुळांवर सूत्रकृमींची लागण झालेली असेल अशी झाडे तेल्या रोगास लवकर बळी पडतात. त्यासाठी निंबोळी पेंड आणि पेंसिलोमायसीस यांच्या वापरावर भर द्यावा, असे आवाहन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या