Friday, April 26, 2024
Homeनाशिकप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना अटक

नाशिक । Nashik

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (Pollution Control Board) संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच (Bribe) मागणाऱ्या दोन अधिकाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने सापळा रचत अटक (Arrested) केली आहे….

- Advertisement -

याबाबत सविस्तर वृत्त असे की,तक्रारदार यांच्या अहमदनगर (Ahmednagar) येथील गोल्ड काऊन्सलिंग क्लस्टर या संस्थेच्या हॉल मार्किंग सेंटरचा कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र देण्याच्या मोबदल्यात संशयित प्रवीण मनोहर जोशी (५७, धंदा- नौकरी,प्रादेशिक अधिकारी ,वर्ग – १ नेमणूक – प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबाद,अति पदभार प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक रा – औरंगाबाद), कुशल मगननाथ औचरमल (४२, पद क्षेत्र अधिकारी वर्ग – २ नेमणूक प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालय नाशिक) यांनी प्रत्येकी १५ हजार असे ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली असता पंचांसमक्ष लाच स्वीकारताना दोघा संशयितांना रंगेहाथ पकडण्यात आले.

दरम्यान, हा सापळा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सुनील कडासने (Sunil Kadasane) अप्पर पोलीस अधीक्षक (Upper Superintendent of Police) नारायण न्याहळदे (Narayan Nyahalde) वाचक पोलीस उपअधीक्षक सतिश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल बागूल, अंमलदार किरण अहिरराव, अजय गरुड, वैभव देशमुख,नितीन डावखर आदींच्या पथकाने यशस्वीरित्या केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या