Friday, April 26, 2024
Homeनगरऐन उन्हाळ्यात गाळ मिश्रित अशुद्ध, पिवळसर पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ऐन उन्हाळ्यात गाळ मिश्रित अशुद्ध, पिवळसर पाण्याचा पुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

शेवगाव | शहर प्रतिनिधि

शेवगाव-पाथर्डी (Shevgaon-Pathardi) या दोन तालुक्याच्या गावासह दोन्ही तालुक्यातील ५४ गावांना पाणी पुरवठा (Water supply) करणाऱ्या प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेतून गेल्या काही दिवसापासून गाळ मिश्रित अशुद्ध, पिवळसर पाण्याचा पुरवठा सुरु असल्याने ऐन उन्हाळ्यात या योजनेच्या लाभ धारक सुमारे अडीच लाख लोकसंख्येच्या आरोग्याची समस्या ऐरणीवर आली आहे.

- Advertisement -

त्यामुळे योजनेच्या संबधितांनी तातडीने उपाय योजना करून जनतेला सुरळीत व शुद्ध पाण्याचा पुरवठा करून जनतेच्या रास्त समस्येला न्याय देण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेचे अध्यक्ष अस्लम शेख व त्यांच्या सहका-यांनी येथील गटविकास अधिकारी तथा पंचायत समितीचे प्रशासक महेश डोके यांच्यासह योजनेच्या सर्व संबधितांना दिले आहे.

Prarthana Behere : पांढऱ्या नक्षीदार साडीतला ‘प्रार्थना’चा मोहक लूक, पहा फोटो

राष्ट्रीय पोलीस प्रोटेक्शन संघटनेचे अध्यक्ष अस्लम हसन शेख व त्यांचे सहकारी अभिजीत इंगळे, गोवर्धन गाडगे, जयश्री ससाणे, धनश्री सर्जे, रामकिसन तापडिया यांनी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या येथील खंडोबामाळ जल शुद्धीकरण केंद्रावर जावून तेथील पाणी पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी योजनेच्या संजय हाडेकर, रवींद्र कांबळे, बाबासाहेब टेकाळे, अशोक गाडगे, अशोक झिरपे, बाबसाहेब झिरपे, जालिंदर डाके, आदी अधिकारी कर्मचा-यांनी योजनेच्या सद्यस्तिथीची माहिती दिली.

Amruta Khanvilkar : ‘अप्सरा हो तुम, या कोई परी’! अमृताचं निळ्या साडीतील भुरळ घालणारं सौंदर्य

गेल्या काही दिवसापासून उच्चांकी तापमानामुळे जनतेला पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्याची वेळ असल्याने योजनेच्या संबधितांनी लाभ धारक ग्रामस्थ नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा करून जनतेचे आरोग्य अबाधित राहील या पद्धतीने पाणी वाटपाचे नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष शेख यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या