Thursday, April 25, 2024
Homeजळगावजळगाव जिल्ह्यात 687 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

जळगाव जिल्ह्यात 687 ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू

जळगाव – Jalgaon

जिल्ह्यात आज दि.१५ जानेवारी रोजी ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी 7.30 वाजता मतदानास शांततेत सुरूवात झाली असून पहिल्या दोन तासात 11.56 टक्के मतदान झाल्याची माहिती महसुल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये आहे मतदान

जळगाव जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ६८७ ग्रा.पं. निवडणूक प्रक्रिया पार पडत असून आज सकाळी ७.३० पासून मतदानास प्रारंभ झाला आहे. यामध्ये जळगाव – ४०, जामनेर ६८, धरणगाव ३८, एरंडोल – २९, पारोळा – ४६, भुसावळ – २४, मुक्ताईनगर – ४७, बोदवड – २७, यावल – ४६, रावेर – ४८, अमळनेर – ५३, चोपडा – ४२, पाचोरा – ८४, भडगाव – २९, चाळीसगाव – ६६ असे एकूण ६८७ ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे.

मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्वोतोपरी उपाययोजना करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या