Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रात राजकीय भूकंप?; संजय राऊतांचे सूचक ट्विट, म्हणाले...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप?; संजय राऊतांचे सूचक ट्विट, म्हणाले…

मुंबई | Mumbai

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवले असून या पत्रात परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. या

- Advertisement -

पत्रानंतर महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र झाली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्यावरच यामुळे प्रश्नचिन्ह लागले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी शायराना अंदाजात सूचक ट्विट केले आहे.

संजय राऊत यांनी गीतकार जावेद अख्तर यांच्या कविता ट्वीट केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, “हमको तो बस तलाश नए रास्तो की है, हम हैं मुसाफिर ऐसे जो मंजिल से आए है.” संजय राऊत यांच्या या ट्वीटचा नेमका अर्थ काय याविषयी चर्चा रंगली आहे.

तसेच या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, ‘सचिन वाझे प्रकरण आणि परमबीर सिंह यांच्या पत्रामुळे राज्य सरकारवर शिंतोड उडाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील मंत्र्यांनी आपले पाय जमिनीवर आहेत का, ते तपासून पाहायला हवं. सरकारमधील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. पोलीस खाते हे राज्याचा कणा असतो. स्वाभिमानाचे प्रतिक असते. हा कणा राज्यकर्त्यांनी मजबूत ठेवायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहता काहीतरी दुरुस्त करावं लागेल तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायम सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोष्टी घडल्या. या सगळ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पण सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. जगभरात सत्तास्थानी बसल्यावर अनेकांना आपण शहाणं असल्याचं वाटायला लागतं, हे या प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आलं. या सगळ्या प्रकरणात शरद पवार योग्य भूमिका आणि निर्णय घेतील. मी आज दिल्लीत जाणार आहे. त्यावेळी शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा प्रयत्न करेन, असं राऊत यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्रक जाहीर करुन आपली बाजू मांडली आहे. तसेच परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे असून त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे.

अनिल देशमुखांनी पत्रकात म्हंटलं आहे की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वत:चा बजाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरुन परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब आपल्या लक्षात येईल. सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर परमबीर सिंग एवढे दिवस शांत का बसले होते? त्याचवेळी त्यांनी आपले तोंड का उघडले नाही? आपणास उद्या म्हणजे दिनांक १७ मार्च रोजी पोलीस आयुक्त पदावरुन हटविण्यात येणार आहे हे लक्षात आल्यानंतर परमबीर सिंग यांनी दिनांक १६ मार्च रोजी पाटील यांना व्हॉट्सअॅप चॅट वरुन काही प्रश्न विचारले आणि त्यांना अपेक्षित असलेली उत्तरे मिळवली. हा परमबीर सिंग यांच्या मोठ्या कटाचा भाग होता. या चॅटच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना पद्धतशीरपणे पुरावे जमा करायचे होते. या चॅटवरुन उत्तरे मिळवताना परमबीर सिंग किती अधीर झाले होते हे त्यांच्या चॅटवरुन आपल्या लक्षात येईल. परमबीर सिंग हे एसीपी पाटील यांच्याकडून वारंवार वदवून घेत आहोत. याचा अर्थ काय?. पोलीस खात्यातील सर्वांना माहीत आहे की सचिन वाझे आणि एसीपी संजय पाटील हे परमबीर सिंग यांच्या अत्यंत जवळचे आहेत. १६ वर्षे निलंबित असलेल्या वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांनी स्वत:च्या अधिकारात घेतला. परमबीर सिंग यांचे आरोप धादांत खोटे आहेत त्यांनी आपले आरोप सिद्ध करावेत. मी त्यांच्यावर अब्रुनकसानीचा खटला दाखल करत आहे.’ असे त्यांनी म्हंटल आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या