Thursday, April 25, 2024
Homeनगरआम्ही टाकीचा अहवाल दडपल्याचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

आम्ही टाकीचा अहवाल दडपल्याचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा

बेलापूर |वार्ताहर| Belapur

आम्ही सत्तेत असताना स्वतःहून पाण्याच्या टाकीचे 2014 मध्ये स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. त्यानंतर

- Advertisement -

माजी आ. स्व. जयंतराव ससाणे यांच्यामार्फत तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री रणजित कांबळे यांच्याकडे पाठपुरावा करून 4 कोटी 17 लाख रुपयांची पाणी योजना मंजूर करून घेतली होती. कामाची टेंडरिंग प्रक्रिया सुरू असताना 2015 ची ग्रामपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्याचे श्रेय आम्हाला मिळू नये म्हणून जि. प. सदस्य शरद नवले यांनी वाड्या वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्याचे कारण पुढे करून फेर इस्टिमेट करण्याचे लेखीपत्र कार्यकारी अभियंता, अहमदनगर यांना देऊन टेंडर प्रक्रिया थांबविली.

त्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे पाण्याच्या टाकीचे काम होऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती असताना ते ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंच यांना पुढे करून आम्ही अहवाल दडवून ठेवल्याचा आरोप म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे, असा आरोप पं. स. सदस्य अरुण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले आणि जनता आघाडी प्रमुख माजी उपसरपंच रवींद्र खटोड यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

2015 मध्ये सत्तेत आल्यानंतर आम्ही त्याच कामासाठी पुन्हा कार्यवाही सुरू केली. दरम्यान केंद्र सरकारने 2016 मध्ये सदरील योजना बंद केली. त्यानंतर 2019 मध्ये आराखड्यात समावेश करून जागा व कागदपत्रांची पुर्तता करून सोलापूर येथील एजन्सीमार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाद्वारे पूर्ण नवीन योजनेसाठी सुमारे 13 कोटी रुपये खर्चाच्या योजनेची प्रक्रिया सुरू केली होती.

त्यात 5 लाख लिटर पाण्याची टाकी, रामगड, गायकवाड वस्ती, सातभाई वसाहत आणि सुभाषवाडी येथे प्रत्येकी 1 लाख लिटरच्या टाकीची उभारणी करणे. तसेच बॅलन्सिंंग टँक ते पाण्याच्या टाकीपर्यंत एक फूट खोलीची सहा किलोमीटर अंतराची पीव्हीसी पाईपलाईन टाकणे यासह अन्य कामांचा समावेश होता.

आता गावासाठी संपूर्ण पाणी योजना नवीन करणे गरजेचे असताना 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून फक्त पाण्याची टाकी बांधून काय साध्य होणार आहे? हा प्रश्न आहे. नवीन पाण्याच्या टाकीबरोबरच नवीन साठवण तलाव, वॉटर सप्लाय फिल्टर प्लॅन्ट, वाड्यावस्त्यांवरची पाईपलाईन, पाण्याच्या टाक्या या कामांचाही समावेश होणे गरजेचे आहे. 14 व्या वित्त आयोगाचा निधी वॉर्डनिहाय खर्च करण्याचा आग्रह धरणार्‍या जि. प. सदस्यांना आता 15 व्या वित्त आयोगातील सर्व निधी टाकीसाठी वापरण्याचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे त्यांना आता वाड्यावस्त्यांवरील कामांचा सोयीस्कर विसर पडला काय?असा सवालही केला आहे.

2008 मध्ये शरद नवले सरपंच असताना 1 कोटी 46 लाख खर्चाची पाणी योजना केली. त्यातील 23 लाख खर्चाचा फिल्टर प्लॅन्ट कोणी गायब केला. त्यामुळे गावाला आज जे खराब पाणी प्यावे लागते ते पाप कोणाचे हे जनतेने समजून घ्यावे,असा खुलासाही यावेळी करण्यात आला. 2015 मध्ये आजचे सरपंच महेंद्र साळवी हे आमच्याकडे उपसरपंच होते. त्यांना सर्व माहीत असूनही त्यांना त्याचा विसर पडला याचे आश्चर्य वाटते.

2008 मध्ये शरद नवले सरपंच असताना 1 कोटी 46 लाख खर्चाची पाणी योजना केली. त्यातील 23 लाख खर्चाचा फिल्टर प्लॅन्ट कोणी गायब केला? त्यामुळे गावाला आज जे खराब पाणी प्यावे लागते ते पाप कोणाचे? हे जनतेने समजून घ्यावे ,असा खुलासाही यावेळी करण्यात आला. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी दुसर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन शरद नवलेंनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे, असा सल्लाही नाईक, नवले, खटोड यांनी या पत्रकार परिषदेत दिला.

स्व. मुरलीधर खटोड यांच्या कार्यकाळात पाणी योजना पूर्ण – रवींद्र खटोड

दि.28 डिसेंबर 1971 रोजी ग्रामविकास मंत्री स्व. आबासाहेब निंबाळकर यांच्या हस्ते तसेच स्व. घमाजी कुर्‍हे (सरपंच) आणि स्व. वासुदेव पा. कोळसे (उपसरपंच) यांच्या कार्यकाळात पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. नंतर वाढीव योजनेसह पाणी योजनेचे काम 1978 मध्ये स्व. मुरलीधर खटोड यांच्या काळात पूर्ण झाले. त्यानंतर 1984-90 या काळात सरपंच मुरलीधर खटोड व उपसरपंच प्रतापराव नाईक पा. असताना ऐनतपूर- सुभाषवाडी येथील योजना पूर्ण झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या