Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलिओचे लसीकरण यशस्वी करा

पोलिओचे लसीकरण यशस्वी करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सुदृढ पिढिसाठी पोलिओचे लसीकरण यशस्वी केल्याने उद्याची सक्षम पिढी निर्माण होणार आहे. यासाठी या लसीकरण अभियानातून कोणी सुटणार नाही,

- Advertisement -

याची खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व जिल्हा रुग्णालय यांच्या विद्यमाने आयोजित पोलिओ लसीकरण मोहीम शुभारंभ प्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, 2011 नंतर भारतात एकही पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही, ही आरोग्य विभागतील कर्मचार्‍यांनी केलेली यशस्वी कामाची पावती आहे.

या अभियानात आरोग्य कर्मचार्‍यांनी नवजात शिशू, बालके यांची लसीकरणाचे उद्दिष्ट वाडी-वस्तीवर जाऊन वेळेत पूर्ण करावे.एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन घुले यांनी केले. यावेळी डॉ. संदीप सांगळे म्हणाले, जिल्ह्यामध्ये साडेचार लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यासह ग्रामीण भागामध्ये तीन दिवस आणि शहरी भागात पाच दिवस हे लसीकरण सुरू राहणार आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने या मोहिमेची तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार वीटभट्टीवर काम करणारे कामगार त्यांच्यासाठी खास मोबाईल टीम तयार करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्ष रेश्मा आठरे, निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. संजीव, डॉ. वेळंबे, मनोज घुगे, डॉ. दादासाहेब साळुंखे, अधिसेविका श्रीमती व्ही.आर गायकवाड, संदीप काळे, पंकज काळे आदींसह परिचारिका उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या