लोणी |वार्ताहर| Loni
राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील विखे महाविद्यालय चौकात पोलीस वाहनाने धडक दिल्याने लोणी येथील महिलेचा मृत्यू झाला. लोणी खुर्द येथील सिंधुताई नगर मध्ये राहणार्या गौरी योगेश देशपांडे (वय 38) या ह्या शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आपली मुलगी तनया (वय 3 वर्षे) हिला घेवून आपल्या दुचाकी (क्र. एमएच 17 बीएच 6925) वरून विखे महाविद्यालय चौकातून जात असताना पोलीस कमिशनर कर्नाटक यांना डिलिव्हरी देण्यासाठी घेऊन जात असलेले अशोक लेलंड कंपनीचे वज्र वाहन समोरून भरधाव वेगाने आले.
त्याने गौरी देशपांडे यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला तर तनया हिचा हात फ्रॅक्चर झाला. त्याचबरोबर तेथून जाणार्या कोळपेवाडी येथील विनोद दुबे यांच्या दुचाकीला धडक दिली. मात्र ते थोडक्यात बचावले.लोणी पोलिसांनी वज्र वाहन चालक सोमनाथ रेखु चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.