Thursday, April 25, 2024
Homeनगरचोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण

चोर्‍या रोखण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सद्यस्थितीत नगर शहरासह जिल्हाभरात दुचाकीवरून महिलांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रमाण वाढत आहे.

- Advertisement -

याप्रकाराला आळा घालण्यासाठी बीटवर असलेल्या पोलिसांना वेगळ्या प्रकारचे दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

नगर-कल्याण महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज इंजीनियरिंग कॉलेजमध्ये जिल्हाभरातील पोलीस कर्मचार्‍यांसाठी आयोजित दुचाकी प्रशिक्षणाच्या वेळी अधीक्षक पाटील बोलत होते.

यावेळी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, विकास देवरे, पुणे येथील प्रशिक्षक संग्राम देवेकर, वरद मोरे, प्राचार्य डॉ. नगरकर आदी उपस्थित होते. अधीक्षक पाटील म्हणाले, दिवसेंदिवस रस्त्यांवरील गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्त्यावरील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे असल्यास पोलीस कर्मचार्‍यांना नवीन पद्धतीचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हाभरातील बीटवर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांसाठी दुचाकी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षणात रस्त्यावरील गुन्हा घडल्यास पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करताना वाहन कशाप्रकारे चालवायचे, आरोपीचा पाठलाग करताना नागरिकांची सुरक्षितता कशाप्रकारे जपायची, तसेच आरोपीला सुरक्षित पद्धतीने कसे पकडायचे याबाबत प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले. या प्रशिक्षणात जिल्हाभरातील पोलीस कर्मचारी व अधिकार्‍यांनी सहभाग घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या