Friday, April 26, 2024
Homeनगरकरोनाने मानवता हाच धर्म असल्याची जाणीव करुन दिली - फा. शिणगारे

करोनाने मानवता हाच धर्म असल्याची जाणीव करुन दिली – फा. शिणगारे

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी|Pathardi

तहसील कार्यालयाचा परिसर व पोलीस स्टेशनचे आवार घाणीचे आगर बनले आहे असून अधिकारी, कर्मचारी व शासकीय कामासाठी येणारे नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

गेल्या पाच वर्षांत या परिसराची स्वच्छता झालेली नाही. याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे पण ते लक्ष देत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.

शहराच्या मध्यवस्तीत सुमारे 15 एकर परिसरात तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, दुय्यम निबंधक, उपकोषागार, नगररचना कार्यालय, सेतूकेंद्र, समुपदेशन केंद्र अशा इमारती आहेत. कैद्यांसाठी असलेल्या स्वच्छता गृहात पुरेसे पाणी नाही. साफसफाई करण्यासाठीसुद्धा कैद्यांना पाणी पुरत नाही.

आवारात कोठेही सार्वजनिक स्वच्छता गृह नसल्याने परिसरातील मोकळ्या जागेचा उपयोग गरजुंकडून स्वच्छता गृहासाठी होत आहे. तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीतील स्वच्छतागृहे सुध्दा उपयोगात नाहीत. समुपदेशन केंद्राची मागची बाजू पूर्णपणे घाणीने व दुर्गंधीने बंद असून रात्रीचे काय पण दिवसासुध्दा डासांमुळे तेथे बसता येत नाही.

पोलीस स्टेशनचे छोटेसे पटांगणसुध्दा अपघातग्रस्त वाहने, जप्त वाहने व कुजलेल्या वाहनांमुळे गैरसोयीचे व अडचणीचे बनले आहे. आवारात अस्ताव्यस्त पडलेल्या या वाहनांमुळे पोलीस स्टेशन की मोटार गॅरेज असा प्रश्न पहिल्यांदा येथे येणार्‍या नागरिकांना पडतो आहे.

तहसील कार्यालयाची जुनी इमारत पोलिसांकडून वापरली जाते. तेथे अधिकार्‍यांची दालने सुरू आहेत. पोलीस स्टेशन व तहसील कार्यालयाची मागची बाजू यामधील जागेचा वापर येण्या-जाण्यासाठी केला जातो. शेजारील जैन विद्यालयाच्या बाजूने मोठा चर खोदून ठेवला असून नगररचना कार्यालयाच्या बाजूलासुद्धा मोठ्या प्रमाणात घाण आहे. काही पोलीस व शासकीय कर्मचारी नुकतेच करोना मुक्त होऊन कामावर हजर झाले आहेत.

काटेरी झुडूपं, तुंबलेल्या गटारी, डुकरांसह मोकाट प्राण्यांचा मुक्त संचार यामुळे कार्यालय की गावठाण परीसर असा संभ्रम लोकांच्या मनात निर्माण झाला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारात स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशीच फक्त पालिकेचे सफाई कामगार झाडलोट करतात. त्याशिवाय येथे कधीही स्वच्छता होत नाही. दुर्गंधीमुळे लोकांना फारकाळ थांबता येत नाही, एवढी दुर्गंधी आहे. कर्मचारीसुध्दा अस्वच्छता व दुर्गंधीला वैतागले आहेत. शेजारी राहणार्‍या लोकांना सुध्दा घाणीचा त्रास होतो आहे.

सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरते. परिसरात पुरेसा उजेड नसल्याने विंचूकाट्यापासून स्वतःचे रक्षण करत लोकांना कामकाज उरकावे लागते. विशेषतः पोलीस स्टेशनमध्ये कामासाठी आलेल्यांना असा अनुभव येतो. बिनतारी संदेश यंत्रणेच्या दालनाच्या बाहेरील बाजूने सुध्दा डासांचे थवे व दुर्गंधीमुळे कर्मचारी हैराण झाले आहेत.

मच्छर अगरबत्तीच्या अति वापराने काही कर्मचार्‍यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शासकीय इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी दरवर्षी स्वतंत्र निधी उपलब्ध होतो. करोना, साथरोगाच्या पार्श्वभूमीवर तरी पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, व तालुका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन परिसर स्वच्छता करावी अशी लोकांची मागणी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या