Wednesday, April 24, 2024
Homeनगरपोलिसांचे सर्चिंग चाँद‘बिबी’

पोलिसांचे सर्चिंग चाँद‘बिबी’

अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात फरारी बाळ बोठेच्या अटकेसाठी एलसीबी पोलिसांनी आज बुधवारी भल्या पहाटेच चॉदबिबी महल परिसरात सर्चिंग केले. मात्र तेथे बोेठे मिळून आला नाही.

जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला गळा चिरून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. मोबाईल कॅमेर्‍यात कैद झालेल्या फोटोवरून पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा करत 5 जणांना अटक केली. जरे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली असून ती सुपारी ज्येष्ठ पत्रकार बाळ.ज.बोठे याने दिल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यानुसार बोठेलाही आरोपी करण्यात आले. बोठे पोलिसांना चकमा देत पसार झाला आहे. दरम्यान त्याने काल नगरच्या कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्यावर कोर्टाने पोलिसांचे म्हणणे मागविले आहे. शुक्रवारी त्यावर सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

फरार बोठे हा नगरमध्ये असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी चाँदबिबी महाल परिसरातील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या फार्म हाऊसची तपासणी केली. भल्या पहाटेच ही मोहीम राबविली. पण तेथे बोठे मिळून आला नाही. पोलिसांच्या या कोम्बिंग ऑपरेशनची चर्चाही गुपीत ठेवण्यात आली. याच परिसरात पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला अटकेसाठी फौजफाटा तैनात केल्यानंतर ही मोहीम माध्यमांना समजली.

- Advertisment -

ताज्या बातम्या